Home पाचोरा राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा खो-खो संघाची निवड जाहीर; हेतल पाटील व...

राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा खो-खो संघाची निवड जाहीर; हेतल पाटील व प्रतीक सपकाळे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा….!!!!!

राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा खो-खो संघाची निवड जाहीर; हेतल पाटील व प्रतीक सपकाळे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा….!!!!!

 

 

 

भडगाव, (क्रीडा प्रतिनिधी) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने सोलापूर येथे सन २०२६-२७ या वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या कुमार/मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड नुकतीच करण्यात आली. ही स्पर्धा दि. २ ते ५ जून २०२६ दरम्यान किरण स्पोर्ट्स,सोलापूर येथे होणार आहे.

 

संघ निवड समितीमध्ये दत्ता महाजन, विशाल पाटील, दिलीप चौधरी, निखिल पाटील, गोपाल पवार व हर्षल बेडीस्कर यांनी काम पाहिले.

 

निवड झालेल्या संघास स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे, प्रा. डी. डी. बच्छाव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणपतराव पोळ, उदय पाटील, एन. डी. सोनवणे, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर, सुनील समदाणे , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे राज्य सहसचिव जयांशू पोळ, सौ. विद्या कलंत्री तसेच जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मुली संघ :

हेतल पाटील (कर्णधार), पुर्वी सोनवणे, सोनाली घेंगट, नेहा धांडे, विभा सोनवणे, कोमल नेहते, अंतरा सराफ, जिविका पाटील, पुर्वा पाटील, गौरी जाधव, माधुरी गायकवाड, पायल पावरा, मयुरी गायकवाड, प्रतिक्षा पानगळे, यज्ञा पवार.

 

प्रशिक्षक : दिलीप चौधरी

व्यवस्थापक : वर्षा सोनवणे

 

कुमार संघ :–

प्रतीक सपकाळे (कर्णधार), राधेश्याम बारेला , रुद्राक्ष माळी, आर्यन पावरा, बादल पावरा, दुर्गेश कोळी, यश गवळी, रोहित पावरा, रेहान तडवी, जयेश धनगर, कृष्णा महाजन, नैतिक ठाकूर, आर्य सेतवाल, धनंजय चौधरी, सचिन राठोड.

 

प्रशिक्षक : गोपाल पवार

व्यवस्थापक : यशवंत लांबोळे

 

निवड झालेल्या सर्व खेळाडूंना जिल्हा खो-खो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत राज्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून जळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे

Don`t copy text!