सोयगाव : पंचायत समितीचे वरिष्ठ संपतराव गीते सेवानिवृत्त ; कर्मचाऱ्यां तर्फे सत्कार
सोयगाव, दत्तात्रय काटोले
सोयगाव येथील पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक संपतराव गीते हे कालमानानुसार दी.३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांना शुक्रवारी (दी.२९) पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांतर्गत निरोप देण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण
यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी गट विकास अधिकारी अमोल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सेवानिवृत्त सत्कारमूर्ती सहाय्यक संपत गीते यांचा कर्मचाऱ्याच्या वतीने भेटवस्तू,साडी चोळी, शाल श्रीफळ देऊन सह पत्नी सत्कार करण्यात आला.
यावेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्रसिंग पाटील, वरिष्ठ सहायक सचिन धुमाने, शोभा पवार एमआरजीएसचे कटके, निकम, शोभा पवार, शितल सनांसे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश गवळी,
शिवप्रसाद बिरारी, कनिष्ठ सहायक विकास भारती, काळे, एस आय पडघन, कनिष्ठ सहायक अमोल गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते.























