गो.पु.पाटील विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा

गो.पु.पाटील विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा

कोळगाव ता-भडगाव- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,माध्यमिक विद्यालय,कोळगाव येथे शासनाने आदेशीत केल्याप्रमाणे कोव्हिड-१९ चे नियम पाळीत ४ अॉक्टोबर २०२१ रोजी इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वीचे वर्गांची सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांंच्या स्वागतासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा सुशोभित करुन रांगोळी काढून,फुलांनी तसेच ठिकठिकाणी फुगे बांधून सजावट करण्यात आली होती,यावेळी कोळगाव नगरीचे प्रथम नागरिक सरपंच काशिनाथ हरचंद महाजन,उपसरपंच आनंदा फकिरा महाजन,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन युवराज सोनू पाटील,पालक सदस्य धनंजय बाबुराव पाटील आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम प्रत्येक विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ,फुगे व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले, उपस्थित विद्यार्थांना डी.एन.पाटील व ए.एस.कोळगावकर यांनी कोव्हिड – १९ संदर्भात नियमांची सखोल माहिती करुन देत काळजी घेण्याचे आवाहन केले.
संस्थेचे चेअरमन आदरणीय प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच प्राचार्य सुनिल पाटील,केंद्रप्रमुख संजय न्हायदे तसेच पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.ए.वाघ यांनी तर योगेश बोरसे यांनी आभार मानले, तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण दिनेश राजपूत यांनी केले,कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मेहनत घेतली.