नांद्रा येथे आदित्य ठाकरे यांची शिवस्मारकाला भेट

नांद्रा येथे आदित्य ठाकरे यांची शिवस्मारकाला भेट

नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी) येथे शिवसंवाद यात्रेच्या जळगाव दौरा निमित्त आलेले माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सामनेर सह नांद्रा येथील ऐतिहासिक व भव्य छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजामाता, धर्मवीर संभाजी महाराज,यांच्या शिवस्मारकाला नांद्रा गावात येऊन त्या ठिकाणी सर्व प्रतिमेचे पूजन व माल्यारपण केले याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी व इतर मान्यवरील मोठया संख्येने उपस्थित होते याप्रसंगी मोठा पोलीस फौज फाट्या सह शिवसैनिकांच्या अंदाजे 200 मोटरसायकल रॅली सुद्धा पुढे चालत असल्याने एकच भगवे वातावरण परिसरात निर्माण झाल्याने त्याचे आकर्षण संपूर्ण रस्त्यावरून दिसत होते यासह परिसरातील मोठ्या संख्येने शिवसैनिक ग्रामस्थ व नवतरुण नांद्रा येथे हजर होते