प्रतापराव ढाकणे यांनी तुतारी वाजवत शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन भाजपला खिंडार पाडले?

प्रतापराव ढाकणे यांनी तुतारी वाजवत शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन भाजपला खिंडार पाडले?

‌ (सुनिल नजन” चिफ ब्युरो” अहमदनगर जिल्हा) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अनेक गावांतील ससेहोलपट होउन भ्रमनिरास झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन भाजपला खिंडार पाडले.पक्ष सोडून आलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असे आश्वासन दिले.राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ योगिताताई राजळे, पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, योगेश रासने, महारूद्र किर्तने, बंडू बोरुडे, सिताराम बोरूडे, हुमायून आतार, गहिनीनाथ शिरसाठ, रत्नमाला उदमले यांच्या उपस्थितीत हा तुतारी हातात घेऊन सन्मान सोहळा संपन्न झाला.राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांचा वारसा चालवत हा पक्ष पुढे जात आहे असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की मुळ शिवसेना हा पक्ष कोणाचा ठाकऱ्यांचा निवडणूक आयोगाला हाताशी धरून दिला कोणाला गद्दारांना, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कोणाचा शरदचंद्रजी पवार यांचा ते हयात असताना दिला कोणाला धरणात सु सु करणाऱ्यांना,भाजपचा एकच नारा, तुरुंगा पेक्षा भाजप बरा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार हा गट नसुन तो बाप आहे.तो राष्ट्रीय पक्ष झाल्या शिवाय राहणार नाही.लोकसभेला तुमच्या मनातील खासदार दिला जाईल असे फाळकेंनी सांगितले.महिला जिल्हाध्यक्षा सौ योगिताताई राजळे व तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे यांनी भर सभेत शेवगाव पाथर्डी तालुक्यातील रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या फाईली मधील कागदपत्रे दाखवून टक्केवारीच्या खेळात ठेकेदार कसे हैराण झाले आहेत या संदर्भातील पाथर्डीतील पुर्व भागातील एका गावातील प्रत्यक्ष नमुनाच हातात कागदपत्रे सादर करून दाखविला.पत्रकारा समवेत आमदार एका बाजूला आणि मी एका बाजूला बसवून मतदारसंघातील झालेल्या कोट्यवधी रुपयांचा कामांचा हिशोब देण्याची मागणी करत केंद्रातील भाजप आणि राज्यातील महायुतीच्या सरकारवर सडकून टीका केली.महाराष्ट्रातील रायगडावर तुतारी फुंकून नव्यानं पक्षचिन्ह स्थापन केल्यानंतर सर्व प्रथम अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी -पाथर्डी येथील मातीत हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा वर झालेल्या हल्ल्यात आमदारांचा हात असल्याचा आरोप देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी केला होता त्याचा साधा इंन्कारही लोकप्रतिनिधी नी केला नाही असा आरोप एका कार्यकर्त्याने केला.म्हणजे भाजपात नेमकं चाललंय काय असा सवालही उपस्थित केला गेला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पक्ष फुटीच्या संदर्भात या भागातील भाजपाच्या आमदार नेमकी काय उपाययोजना करतात आणि प्रतापराव ढाकणे यांनी भरसभेत केलेल्या आरोपांना नेमकं काय उत्तर देतात याकडे सर्व भाजपाचे कार्यकर्ते आणि मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.