Home पाचोरा पाचोरा येथे सुप्रसिद्ध भीमगीत गायक आनंद शिंदे यांचा भव्य कार्यक्रम – उपस्थितीचे...

पाचोरा येथे सुप्रसिद्ध भीमगीत गायक आनंद शिंदे यांचा भव्य कार्यक्रम – उपस्थितीचे आवाहन

पाचोरा येथे सुप्रसिद्ध भीमगीत गायक आनंद शिंदे यांचा भव्य कार्यक्रम – उपस्थितीचे आवाहन

 

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) –दि २४

आंबेडकरी चळवळीतील प्रेरणादायी भीमगीतांनी संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भव्य भीमगीतांचा कार्यक्रम येत्या शनिवारी सायंकाळी ७ वाजता पाचोरा बस स्थानक परिसर नागसेन नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामुळे तालुक्यातील आंबेडकरी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.आमदार किशोर आप्पा पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून एम एस पी बिल्डकॉनचे मनोज पाटील यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.

सामाजिक ऐक्य, समता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली जात आहे. आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजातील भीमगीते हे आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान मानले जाते. त्यांच्या गाण्यांमधून सामाजिक न्याय, बंधुता आणि परिवर्तनाचा संदेश दिला जातो.

कार्यक्रमाचे आयोजन पाचोरा भडगाव तालुक्यातील राष्ट्रपिता मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रमस्थळी उत्तम ध्वनी व्यवस्था, बसण्याची सोय व सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच, कार्यक्रमाला प्रसिद्ध गीतकार सागर पवार, पाचोरा नगराध्यक्ष सुनीता पाटील,उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,गटनेते सुमित पाटील,बाजार समिती सभापती गणेश पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम,तहसीलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे,पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार,आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील यांचेसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात सांस्कृतिक व सामाजिक वातावरण अधिकच भारावून जाणार असून, भीमगीतांच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्याचा हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. तरी समस्त शाहू फुले आंबेडकरी जनतेने कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन शिवशक्ती भीमशक्ती सेनेच्या वतीने प्रवीण ब्राह्मणे,विकी बाविस्कर,सनी साठे, रोहित ब्राह्मणे,अनुराग खेडकर,जयेश तायडे, संघमित्र लोंढे, भय्या खेडकर,भीमराव खैरे, सचिन केदार, सागर अहिरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Don`t copy text!