श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज “78” वा स्वातंत्र्य-दिन मोठ्या उत्साहात संपन्न

श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज “78” वा स्वातंत्र्य-दिन मोठ्या उत्साहात संपन्न

 

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज “78” वा स्वातंत्र्य-दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्य इमारतीत शालेय समितीचे चेअरमन बापूसो.जगदीश सोनार यांच्या हस्ते तर भडगाव रोड विभागात संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका ताईसो.जिजाबाई अभिमन्यू पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच शाळेत आज🏆 बक्षीस वितरण, 📒शालेय साहित्य वाटप व 🌳वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन माननीय बापूसो जगदीश सोनार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन नानासो.संजय वाघ,व्हॉइस चेअरमन नानासो.व्ही.टी. जोशी, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब.दगाजीराव वाघ, जेष्ठ संचालक आप्पासो.सतीश चौधरी,जेष्ठ संचालक दादासो.अर्जुनदास पंजाबी, संस्थेचे समन्वयक जीभाऊसो. एस.डी.पाटील सर,शालेय साहित्याचे मान्यवर दाते दादासो.प्रकाश नथमल जैन,भाऊसो.अपूर्व थेपडे,ताईसो.आशा भुजंगे, भाऊसो.मनोज शांताराम पाटील,दादासो.अश्विन वाघ,भाऊसो.किशोर नारेराव व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.आयटीएस परीक्षेतील गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या व शालेय गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता 4 थीच्या विद्यार्थ्यांनी सर्वधर्म समभाव या विषयावर “मूक नाटिका” सादर केली. त्याचप्रमाणे शाळेतील श्री. अभिजीत महालपुरे सर, श्रीमती. रूपाली उल्हास पाटील मॅडम,श्रीमती. चारुशीला पाटील मॅडम,श्री. महेश लोखंडे सर,श्रीमती. रूपाली शिवराम पाटील मॅडम यांचा त्यांनी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल सन्मान करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मा.नानासाहेबांनी आपल्या मनोगतातून शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थी व शिक्षक वृंदाचे कौतुक व अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. उज्वला साळुंखे मॅडम यांनी केले.सूत्रसंचालन श्री.दीपक पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती.सारिका पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.