पाचोऱ्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा व भडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने राजश्री छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीयर शिबीर संपन्न

पाचोरा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा व भडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने राजश्री छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीयर शिबीर संपन्न झाले.

 

 

आज दिनांक 03/06/2023 रोजी पाचोरा शहरात स्व.राजीव गांधी टाऊन हॉल पाचोरा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा व भडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने राजश्री छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीयर शिबीर संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आमदार किशोर आप्पा पाटील, पाचोरा – भडगाव मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री एस .एम पाटील सर ,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जळगाव. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री भास्कर बोरोले ,चेअरमन आय.एम. सी आय .टी .आय पाचोरा ,द्वारका इंडस्ट्रीज जळगाव व माननीय श्री अरुण नंदर्शी चेअरमन आय.एम. सी आय .टी .आय भडगांव , चैतन्य स्टील जळगाव उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री डॉ.अतुल संतोष सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर संबोधीत केले व माननीय श्री नरेंद्र पाटील सर यांनी दहावी व बारावीनंतर करीअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ उज्वला महाजन मॅडम यांनी केले
कार्यक्रमाच्या शेवटी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा माननीय प्राचार्य श्री एस एस जुमनाके यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध व्यवसायातील संधी चे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले
तसेच कार्यक्रमाच्या शेवटी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा मा.व्हि.जी भोळे सर प्रभारी गटनिदेशक यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा व भडगाव येथील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.