आ.किशोर पाटील यांच्या हस्ते पाचोऱ्यात रविवारी ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन शहर विकासात पडणार भर

आ.किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते पाचोऱ्यात रविवारी ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन शहर विकासात पडणार भर

पाचोरा( वार्ताहर) दि,२६
आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या दूरदृष्टीने मतदार संघाच्या विकासात दिवसेंदिवस भर पडत असून रविवार दि.२७ रोजी सकाळी १० वाजता नव्याने मंजूर झालेल्या शहरातील सुमारे ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते होणार आहे. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांचेसह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन सकाळी ११ वाजता प्रोफेसर कॉलनी दत्तू टायर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ,११.१५ वाजता तलाठी कॉलनी ओपन पेस भूमिपूजन ,११.३० वाजता कॉलेज चौक येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे ,११.४५ वाजता तहसीलदार निवास भूमिपूजन रेस्ट हाऊस ,१२:०० अरिहंत नगर व आदर्श नगर ,१२.१५, पुनगाव रोड गणपती नगर ,१२.३० पुनगाव रोड स्वामी समर्थ नगर ,१२.४५ पुनगाव रोड तात्यासाहेब आर ओ पाटील नगर, १ वाजता पंचमुखी हनुमान रोड माहेजी नाका रोड रस्ता काँक्रिटीकरण यासह १.३० वाजता जारगाव येथील व्यायाम शाळा साहित्य लोकार्पण या कामांचा समावेश असून यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील,तालुका प्रमुख सुनिल पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, चंद्रकांत धनवडे, पंढरीनाथ पाटील यांचेसह सर्व आजी माजी नगरसेवक, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभणार असून प्रभागातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.