Home महाराष्ट्र सोयगाव : सोयगाव पंचायत समितीत मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत

सोयगाव : सोयगाव पंचायत समितीत मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत

सोयगाव : सोयगाव पंचायत समितीत मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत

पाच लक्ष रुपयांचा अपहार ; साहित्य खरेदी न करताच निधी गिळंकृत,

तत्कालीन गट विकास अधिकारी दादाराव अहिरे यांचा प्रताप,प.स.सदस्या सविता गव्हांडे यांची पहिल्याच बैठकीत मागणी

दत्तात्रय काटोले, सोयगाव

सोयगाव

येथील पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी सुशोभीकरण व कार्यालयीन साहित्य खरेदी साठी आलेल्या मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत पाच लाख रुपयांच्या निधीचा अपहार केला आहे.या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात येऊन कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सविता सोपान गव्हांडे यांनी बुधवारी (दी.८) पहिल्याच मासिक बैठकीत केली आहे.

 

 

या प्रकरणी पंचायत समिती सदस्या सविता सोपान गव्हांडे यांनी बुधवारी (दी.८) बचत भुवन येथे आयोजित पहिल्याच मासिक बैठकीत गट विकास अधिकारी एस एस यमुलावाड यांच्याकडे निवेदन करीत सुशोभीकरण व कार्यालयीन साहित्य खरेदी साठी आलेल्या मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत तत्कालीन बिडीओ दादाराव अहिरे यांनी बचत भुवनचे कोणतेही सुशोभीकरण व सोफा,फर्निचर,खुर्च्या,पंखे,कुलर, स्वच्छ्ता व ईतर साहित्य खरेदी न करताच पाच लाख रुपयांच्या निधीचा अपहार केला आहे.या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात येऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

या निवेदनात पुढे असेही म्हंटले आहे की,

कनिष्ट सहाय्यक बिऱ्हारे यांच्याकडे असलेल्या वाहन/भांडार विभागात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांकडे असलेल्या वाहन/भंडार विभागाची टेबल तपासणी करून अहवाल सादर करणेचे आदेश काढण्यात आलेले होते. तथापि ह्या अनुषंगाने टेबल तपासणी करणे करिता सुरवात केली असता बिरारी कनिष्ट सहाय्यक हे रेकॉर्ड दाखविण्यास टाळाटाळ करीत आहे. वेळोवेळी विचारणा केली असता सबंधित लिपिक रेकॉर्ड साठा नोंदवही, साहित्य वाटप नोंदवही

 

इतर रेकॉर्ड दाखविण्यास टाळत आहे.

 

चौकट :

मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गतरु पाच लक्ष निधी प्राप्त झालेला होता. कार्यालयीन साहित्य सोफासेट रु.७५,०००/- १ नग, टेबल, खुर्च्छा, व्हील चेहर इत्यादी साहित्य खरेदी केले आहे. परंतु साहित्य प्रत्यक्ष आलेले नाही. पुरवठा दाराने पुरवठा केला नाही इ. बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच या रक्कमेचा खर्च दाखविण्यात आलेला आहे परंतु प्रत्यक्षात वस्तू प्राप्त नाहीत. तसेच बचतभवन इमारतीची रंगरंगोटी केल्याचे दाखवून नियम बाह्य देयके अदा करण्यात आलेली आहे.

 

याप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी व भंडार विभागाचे कर्मचारी यांची दप्तर तपासणी करून चौकशी करण्यात यावी व दोषींवर कार्यवाही करणेची विनंती प.स.सदस्या सविता सोपान गव्हांदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

फोटो,दत्तात्रय काटोले

Don`t copy text!