Home पाचोरा ज्यांनी दिली आयुष्याला दिशा, अशा शिक्षिका स्वाती अमृतराव पाटील मॅडम यांच्या ग्रेडेड...

ज्यांनी दिली आयुष्याला दिशा, अशा शिक्षिका स्वाती अमृतराव पाटील मॅडम यांच्या ग्रेडेड मुख्याध्यापकपदी नियुक्तीवर एका विद्यार्थिनीने व्यक्त केल्या शब्दरूपी भावना कु.चेतना रणदीप हिरे

ज्यांनी दिली आयुष्याला दिशा, अशा शिक्षिका स्वाती अमृतराव पाटील मॅडम यांच्या ग्रेडेड मुख्याध्यापकपदी नियुक्तीवर एका विद्यार्थिनीने व्यक्त केल्या शब्दरूपी भावना कु. चेतना रणदीप हिरे

 

 

 

आदरणीय स्वाती अमृतराव पाटील मॅडम…

आज तुमच्यावर लिहिताना मन भरून येत आहे… शब्द अपुरे पडतात, पण भावना मात्र थांबत नाहीत…

 

मी चेतना हिरे… जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वरखेडी ही माझी शाळा… आणि त्या शाळेने मला केवळ शिक्षणच नाही, तर आयुष्य घडवणाऱ्या व्यक्तीची ओळख करून दिली…२०११ ते २०१४ या कालावधीत मी पहिली ते चौथीचे शिक्षण घेत होते. त्या काळात तुम्ही शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होतात. खरं सांगायचं झालं तर तुम्ही माझ्या वर्गशिक्षिका नव्हत्या… पण तुम्ही मला आयुष्याचे खरे धडे दिलेत…

 

एक आदर्श शिक्षक कसा असतो…?

तर तो फक्त पुस्तकातील धडे शिकवणारा नसतो…तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा असतो…

शिक्षकाचं आयुष्य बाहेरून जितकं सोपं दिसतं, तितकंच ते आतून संघर्षांनी भरलेलं असतं…

मर्यादित साधनं, अनेक अडचणी, वेळेची कसरत…पण तरीही एक शिक्षक स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी झटत असतो…आणि मॅडम, तुमच्यात मला हाच आदर्श शिक्षक दिसतो…

तुम्ही स्वतः एक उपक्रमशील शिक्षिका आहात…विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहता…

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, हे ओळखून त्यांना घडवण्याचं काम तुम्ही मनापासून करता…

आज मला शाळा सोडून अनेक वर्षे झाली…तरीही तुम्ही माझ्या वर्गशिक्षिका नसतानाही माझ्यासाठी जे काही केलं, ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाही…आज मी आत्मविश्वासाने उभी आहे…

माझं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे…आणि या सगळ्याचं श्रेय जर कोणाला जात असेल, तर ते तुम्हालाच…कारण माझ्या जीवनातील त्या पहिल्याच व्यक्ती तुम्ही आहात,

*ज्यांना मी सर्वप्रथम माझा “आदर्श” मानलं…*

आणि आजही तितक्याच अभिमानाने तुम्हाला माझा आदर्श मानते…

तुमचं मार्गदर्शन, तुमची माया आणि तुमची शिकवण आजही माझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहे…

B.Ed., M.Ed. Set सारख्या उच्च शिक्षणाने सज्ज असूनही

तुम्ही तुमचं ज्ञान केवळ स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही…

तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचं आयुष्य घडवलं …आज तुमच्या जीवनातील अत्यंत अभिमानाचा क्षण आणि आम्हा विद्यार्थ्यांसाठी आनंदा क्षण

“ग्रेडेड मुख्याध्यापक” पदावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोजे येथे झालेली तुमची नियुक्ती,हा केवळ तुमचा सन्मान नाही…

*तर आमच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांचा अभिमान आहे…”*

 

आज मनापासून वाटतं —

*“मी स्वाती पाटील मॅडम यांची विद्यार्थिनी आहे, हीच माझी खरी ओळख आहे!”*

 

मॅडम, तुम्ही आम्हाला फक्त शिक्षण दिलं नाही…

तर आयुष्य जगण्याची दिशा दिलीत…तुमचं व्यक्तिमत्त्व म्हणजे संघर्ष, समर्पण आणि प्रेरणेचं जिवंत उदाहरण आहे…

आज तुमच्या या यशाच्या क्षणी मी शुभेच्छांसह माझी कृतज्ञता शब्दांत व्यक्त करत आहे.

 

तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा मॅडम!!

तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहो… हीच प्रार्थना….

 

शब्दांकन

तुमची विद्यार्थिनी

कु. चेतना हिरे हिरे

Don`t copy text!