कोपरे येथे रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत दशरथ पुत्र “श्रीराम” आणि श्रीरामाचे सेवक अंजनीपुत्र जय “जय हनुमान” यांच्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.वै.भगवान बाबा,वै.वामन भाऊ,वै. बाळूमामा, वै.यादवबाबा,वै.सोपान महाराज ढाकणे,यांच्या आशीर्वादाने आणि सर्व ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसिंग,महेश महाराज आव्हाड, वैष्णवी महाराज वाघमोडे यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक २६ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे.वरील काळात पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन सायंकाळी हरीपाठ रात्री ७.३० ते ९.३० हरी किर्तन नंतर हरीजागर या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.सर्व ह.भ.प. आबाजी आंधळे,ठकाजी दिंडे,संजय वारे, बाबासाहेब गडकर,सुर्यभान केसभट,शिवाजी चन्ने या महाराजांची प्रवचने तर सर्व ह.भ.प.महेश आव्हाड,कु. वैष्णवी वाघमोडे, चंद्रकांत दगडखैर,वैभव माळवदे,संकेत शास्त्री,जगन्नाथ शास्त्री,ऋतुजा वैद्य या महाराजांची किर्तने होणार आहेत.दिनांक १ एप्रिलफुल रोजी सायंकाळी दिंडी प्रदक्षिणा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक होणार आहे.गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड (डोंगरवाडी) यांचे काल्याचे किर्तन होउन महा प्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.अखंड हरीणाम सप्ताह काळात उघडे,वाघमोडे, ढाकणे,खरात, दिंडे,सरोदे,माने, आव्हाड,खेडकर, या परीवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे.तर सुमधुर आवाजाची जबाबदारी प्रोपायटर शंकरराव उघडे यांच्या जयमल्हार साउंड सिस्टीम कडे देण्यात आली आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ कोपरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.या सोहळ्यातील ज्ञानेश्वरी पारायण वाचनाचे नेतृत्व ह.भ.प.आबाजी महाराज आंधळे हे करणार आहेत.





















