Home महाराष्ट्र संत बाळूमामा यांच्या भंडाऱ्या निमित्ताने कोपरे येथिल बाळूमामा मंदिरात अखंड हरिनाम सोहळ्याचे...

संत बाळूमामा यांच्या भंडाऱ्या निमित्ताने कोपरे येथिल बाळूमामा मंदिरात अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन

संत बाळूमामा यांच्या भंडाऱ्या निमित्ताने कोपरे येथिल बाळूमामा मंदिरात अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

वै.संत भगवानबाबा,वै. संत वामनभाउ,वै.संत नारायण महाराज,वै.यादवबाबा यांच्या कृपा आशिर्वादाने

संत बाळूमामा यांच्या भंडाऱ्याच्या निमित्ताने कोपरे येथिल बाळूमामा मंदिरात अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर आणि ह.भ.प. महेश महाराज आव्हाड यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक १५ते१९ मार्च या कालावधीत हा सोहळा संपन्न होत आहे.दररोज काकडा भजन,हरीपाठ, आणि हरी किर्तन या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसिंग, बाबासाहेब महाराज मतकर, वैष्णवी ताई वाघमोडे, आदिनाथ महाराज निकम, महेश महाराज आव्हाड,यांची किर्तने होणार आहेत.बुधुवार दिनांक १८ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता दिंडी प्रदक्षिणा होणार आहे.गुरूवार दिनांक १९मार्च २०२६ रोजी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी १०ते१२ या वेळेत ह.भ.प.सुरेशानंद महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होउन नानाभाऊ, नवनाथ, जबाजी उघडे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.वरील काळात वाघमोडे, उघडे,माने,सरोदे यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशी तील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन कोपरे ग्रामस्थांनी केले आहे.

Don`t copy text!