पतसंस्थेच्या नावाखाली पैसे गोळा करून शेअर मार्केट खेळणाऱ्या आरोपीच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले

पतसंस्थेच्या नावाखाली पैसे गोळा करून शेअर मार्केट खेळणाऱ्या आरोपीच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) सुर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमिटेड मुंगी, तालुका, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या नावाने मुंगी गावातील पेठेतील पतसंस्थेच्या नावाखाली पैसे गोळा करून शेअर मार्केट खेळणाऱ्या फरार आरोपीच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे. याबाबतची माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी या गावात सुर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमिटेड या नावाने प्रशांत भारत जैस्वाल, आणि पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल हे सुर्यकोटी मल्टीस्टेट निधी ही पतसंस्था चालवत होते.या पतसंस्थेच्या नावाखाली तालुक्यातील अनेक गोरगरिबांना या पतसंस्थेत या दोघांनी जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवन्यास भाग पाडले होते. हे जमा झालेले पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून सर्व सामान्य लोकांची या दोन ठकसेनांनी फसवणूक केली होती.आणि शेवगाव तालुक्यातून फरार झाले होते. या बाबत अशोक गणपत शेळके राहणार मुंगी, तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हाही दाखल केला होता. गुन्हा रजिस्टर नंबर ८३३/२०२४, भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०,४०६,४०९,३४ या कलमानुसार दिनांक १७/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता.अशोक शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद करण्यात आले होते की वरील नावाच्या मुंगी गावातील सुर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमिटेड या पतसंस्थेत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून १,३८,००,००० इतकी रक्कम गुंतवून केली होती.पण ते पैसे जैस्वाल यांनी शेअर मार्केट मधे गुंतवणूक करून आमची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.सदर आरोपी हे सुर्यकोटी पतसंस्थेच्या नावाखाली पैसे गोळा करून शेअर मार्केट खेळत होते.पैसे गुंतवणूक करणाऱ्यां व्यक्तींना पतसंस्थेच्या नावाने ठेव पावती सुध्दा देत होते.नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी १)प्रशांत भारत जैस्वाल याला शेवगाव पोलिसांनी या पुर्वीच अटक केली होती. परंतु संशयित आरोपी क्रमांक २) पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल हा गुन्हा रजिस्टर झाल्या नंतर सात महीन्यापासुन फरार झाला होता.शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त खबऱ्या मार्फत दिनांक २८/५/२०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कळाले होते की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल राहणार,मुंगी तालुका, शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा वडोज बाजार, तालुका फुलंब्री,जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील हाॅटेलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली होती.शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी एक पोलिस पथक तयार करून ते वडोज बाजार, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी पाठवून दिले होते. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल हा हाॅटेल युवराज बीअर बार ॲन्ड परमीटरूम या ठिकाणी काम करीत असताना त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो मोटार सायकल वरून पळून जात असताना त्याला पोलिसांनी पाठलाग करून शेवता रोड येथे मोठ्या शिताफीने रंगेहाथ पकडून ताब्यात घेऊन शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये आणले आणि सदर नमूद गुन्ह्यात अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. वरील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, गुजरात अशा विविध वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत होता अशी कबुली त्यांने शेवगाव पोलिसांना दिली आहे.पकडलेल्या वरील दोन्ही आरोपी कडून कोणत्याही व्यक्तींची फसवणूक, लुबाडणूक झाली असल्यास त्या विरोधात शेवगाव पोलिस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी केले आहे. सदरची कारवाई ही नव्याने बदलून आलेले अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे,सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे,पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे ,चंद्रकांत कुसारे, पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ ,राहुल खेडकर, धनेश्वर पालवे,संपत खेडकर, संतोष वाघ, राहुल आठरे, तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलिस काॅंन्स्टेबल राहुल गुड्डू, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे यांनी केली आहे. वरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत. शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी या भामट्यांनी जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांना लुटले आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी विधानसभेतील अधिवेशनात ही या विरोधात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न केला होता.हा शेअर बाजार खेळून संपूर्ण मतदार संघातील गावात धुमाकूळ घालणाऱ्या महाभागांची आणि त्यांचे साथीदार असलेल्या वेगवेगळ्या गावांतील अनेक म्होरक्यांची रवानगी आता थेट पोलिस कोठडीत होणार आहे. पण शेअर मार्केट मध्ये फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येवून तक्रारी दाखल केल्या पाहिजेत असे पोलीसांचे म्हणणे आहे.