जवखेडे खालसा येथे हनुमान,शनि, गणपती मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
वृद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन व जेष्ठ नेते उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह.भ.प.श्रीरंग महाराज तळेकर यांच्या अधिपत्या खाली १६ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान,शनि, गणपती मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.वरील कालावधीत दररोज पहाटे काकडा भजन,सकाळी, विष्णू सहस्त्रनाम,ग्रंथ वाचन,हरीपाठ, हरी किर्तन,हरीजागर या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.सर्व ह.भ.प. हरीश्चंद्र महाराज दगडखैर,नामदेव महाराज पोकळे,श्रीराम महाराज मचे, ईश्वर महाराज कदम,यांची किर्तने होणार आहेत.या कालावधीत दररोज मतकर,घाटुळ, आंधळे,वाघ, सरगड,देशमुख, शिंदे,धनवडे परीवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी तारकेश्वर गडांचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होउन नंतर हनुमान नाना चितळे सर यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीत भाविकांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ जवखेडे खालसा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

























