तब्बल २२ वर्षांनी शिक्षकांनी श्री. गो से. हायस्कुल मधल्या १० वी ब वर्गात लावली माजी विद्यार्थ्यांची तासिका

तब्बल २२ वर्षांनी शिक्षकांनी श्री. गो से. हायस्कुल मधल्या १० वी ब वर्गात लावली माजी विद्यार्थ्यांची तासिका

श्री. गो से. हायस्कुल शाळेतील आठवणींना उजाळा देत १० वी ब वर्गात लावली माजी विद्यार्थ्यांची तासिका

शाळेतील आठवणींना उजाळा देत पाचोऱ्यातील श्री. गो से.हायस्कुल विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा पूर्नमिलन सोहळा उत्साहात पार पडला. सन २००१ १० वी ब च्या वर्गातील शाळेचे माजी विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. पुनर्मिलन सोहळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यां मध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.

शाळेचे मुख्याध्यापिका सौ. पी एम. वाघ मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी व्यासपीठावर आजी-माजी शिक्षक पी. आर बडगुजर , श्री. शांताराम चौधरी ,ये जे महाजन ,एस टी आहिरे , बी के मुथा सर , आर एल पाटील , पी एन नागणे ,एस एम चौधरी सर ,श्री. एन के शेख , श्री. जी . व्ही वाणी, श्री. शशिकांत सोनावणे (सावन) -प्रताप कॉलेज अमळनेर ,डी. डी . कुमावत , आर एन सपकाळे ,आर बी तडवी , उपमुख्याध्यापक श्री. एन आर ठाकरे ,प्रयोग शाळा सहायक : श्री. फकिरा पाटील, सेवक वृंद -पांडुरंग माळी , धोंडू चौधरी ,मधुकर चौधरी , ईश्वर पाटील तसेच शाळेचे माजी विद्यार्थी असलेले निहाल देशमुख , भूषण महाजन , पूजा दंडगव्हाळ , वंदना इंदानिया ,प्रीती सूर्यवंशी , आशा पाटील , राजश्री पाटील ,डॉक्टर अजयसिंग परदेशी , बाबुलाल पाटील , सखाराम बागुल, भुवनेश दुसाने, नितीन कानडे , योगेश पाटील, शारीख देशमुख, प्रदीप मराठे, पंकज अमृतकर, सचिन मिस्त्री , दिनेश तायडे, गणेश ठाकूर,निलेश मुणोत, रजनी सोनार ,अख्तर शेख, संदीप मराठे तसेच अनेक मान्यवर माजी विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी आजी-माजी शिक्षक पी. आर बडगुजर , श्री. शांताराम चौधरी ,ये जे महाजन ,एस टी आहिरे , बी के मुथा सर , श्री. जी . व्ही वाणी, श्री. शशिकांत सोनावणे (सावन) -प्रताप कॉलेज अमळनेर ,डी. डी . कुमावत , आर एन सपकाळे ,आर बी तडवी यांची भाषणे झाली. प्रस्ताविक डॉक्टर अजयसिंग परदेशी यांनी केले. सुत्रसंचालनप्रमोद महाजन यांनी तर आभार प्रदर्शन ऍड . राजश्री पाटील यांनी मानले. या वेळी प्रत्येकवर्षी दिवाळीत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. संघटनेच्या वाटचालीसाठी अनेकांनी आर्थिक देणीही जाहीर केली.