Home महाराष्ट्र तिसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात एकुण 1708 दाखल्याचे वाटप 

तिसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात एकुण 1708 दाखल्याचे वाटप 

तिसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात एकुण 1708 दाखल्याचे वाटप

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

शासनाच्या विविध विभागा मार्फत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी,महिला यांच्या शासनाच्या विविध विभागाशी‌ संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे,जनतेच्या तक्रारी निकाली काढणे,तसेच महसूल प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम,आणि अधिक गतिमान करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातील मंडल स्तरावर या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.त्याच शिबीराचा एक भाग म्हणून अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात एकूण १७०८ दाखल्याचे वाटप करण्यात आले.सुरवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 43 दाखले वाटप करण्यात आले. राहिलेले सर्व दाखले यथावकाश देण्यात आले.या मध्ये महसूल विभागातील,‌ आपले सेवा केंद्र, पुरवठा शाखा, संजय गांधी निराधार शाखा, आरोग्य विभाग, बालविकास विभाग,एसटी महामंडळ,कृषी विभाग, प्रधानमंत्री किसान,भुमी अभिलेख विभाग या सर्व विभागातील दाखले,नोंदी, समस्या,सर्व सामान्य लोकांच्या अडी अडचणी सोडविण्या साठी विषेश प्रयत्न करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते आणि अहिल्या नगर चे अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हींगे आणि पाथर्डीचे प्रांधिकारी प्रसादजी मते साहेब यांच्या उपस्थितीत हे दाखले वाटप करण्यात आले आणि काही समस्यांचे निराकरण करण्यात आले. या मध्ये कासार पिंपळगाव, करडवाडी, तिसगाव,मांडवे येथील काही समस्यांचे निराकरण करण्यात आले.प्रथम प्रमुख पाहुण्यांचे शालेय विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाद्वारे जोरदार स्वागत करण्यात आले.नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला अभिवादन करण्यात आले आणि दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमात सुरूवात करण्यात आली.तिसगाव परीमंडल क्षेत्रातील अनेक गावांतील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब यांनी हा उपक्रम घेण्यामागचा शासनाचा काय उद्देश आहे ते सांगितले.अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हींगे साहेब यांनी अनेक तक्रार अर्जावर शेरे मारून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.या शिबिरामध्ये प्रामुख्याने सातबारा उताऱ्यावरील चुका दुरुस्ती,डीजीटल उतारे वाटप, उत्पन्न,रहीवाशी, आणि जातीचे दाखले वाटप,नाॅन क्रिमिनल,पी एम किसान नोंदणी, पुरवठा विभागातील प्रमाणित नोंद, इत्यादी कागदपत्रे देण्यात आले.आमदार राजळे यांनी सरकार आपल्या दारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील सर्व गावातील लाभार्थ्यांनी या शिबीरात उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.बोधेगाव, कोरडगाव, तिसगाव,नंतर आता मीरी करंजी महसूल मंडलात पुढील उपक्रम घेण्यात येणार आहे.या कार्यक्रमास तिसगावचे जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे, उपसरपंच पंकज मगर,बाळासाहेब लवांडे,जवखेडे खालसा येथील सरपंच चारूदत वाघ,वैभव आंधळे,युवा नेते कुशल भापसे,आठरे, मैड,शेख,मंडल अधिकारी प्रमोद कटारनवरे, तलाठी ऋषिकेश घोरतळे,संदिप आठरे,सचिन दहीहंडे,सुप्रिया शिंदे,कल्पना धाडगे,सुनंदा आंधळे,तिसगाव येथील सेतुचालक, संभाजी म्हस्के,चितळे,हे आवर्जून उपस्थित होते. आपल्या हातात नवीन कागदपत्रे मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Don`t copy text!