श्री सु.भा .पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे पालक संवाद सभा उत्सवात संपन्न
पा.ता.स.शि.संस्था संचलित, श्री सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा (भ.रो) येथे दिनांक :११/३/२०२६
रोजी पालक संवाद सभा आयोजित करण्यात आली. या सभेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळा व पालक यांच्यात समन्वय साधने हा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती प्रा. जयश्रीताई वाघ यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच पालक प्रतिनिधी संजय सोनवणे दादा यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती जयश्रीताई वाघ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती उज्वला साळुंखे मॅडम यांच्या समवेत गो.से.हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री आर. डी. बोरसे सर व श्री रुपेश पाटील सर तसेच भडगाव रोड विभागाचे विभाग प्रमुख दीपक पाटील ज्येष्ठ शिक्षिका सारिका पाटील मॅडम मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे भ.रो. विभागाचे विभाग प्रमुख श्री दीपक पाटील सर यांनी प्रास्ताविक सादर करून पालकांशी संवाद साधने का गरजेचा आहे …?तसेच विद्यार्थ्यांसाठी नियमित राबवल्या जाणाऱ्या विविध सहशालेय उपक्रमांची माहिती याबद्दल पालकांशी संवाद साधला. तसेच शाळेतील ज्येष्ठ *शिक्षिका श्रीमती सारिका पाटील मॅडम* तसेच *गो.से.हायस्कूलचे शिक्षक आर .डी .बोरसे* सर तसेच आमच्या शाळेतील *मुख्याध्यापिका आदरणीय उज्वला साळुंखे मॅडम* यांनी आपली मनोगते आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर आपली मते मांडली. *अध्यक्षीय मनोगत प्रा सौ जयश्रीताई वाघ यांनी व्यक्त केले.*
या प्रसंगी जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था जळगाव आयोजित पुरस्कार वितरण समारंभात उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी *ज्ञानवंत शिक्षक पुरस्कार* मा अप्पासो निळकंठ गायकवाड साहेब, जळगाव मनपा माजी महापौर जयश्री ताई महाजन यांच्या हस्ते *श्रीमती रूपाली उल्हास पाटील- साळुंखे मॅडम यांना मिळाल्याबद्दल त्यांचा *सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री पाटील मॅडम यांनी केले. तर आभार श्रीमती रूपाली निकम मॅडम केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहकारी शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले.
























