तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व्रुक्षलागवड कार्यक्रम संपन्न,परंतु उपकेंद्रातील डॉक्टरांच्या अनेक समस्या कोण सोडवणार ?
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण राज्यभर महसूल सप्ताह जोरात सुरू आहे.याचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मोकळ्या जागेत व्रुक्षारोपण करण्यात आले.तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबासाहेब होडशिळ,डॉक्टर प्रशांत आव्हाड,आरोग्य सहाय्यक शिवाजी पालवे,वैभव गर्जे, दिपक बनसोडे,संतोष गोहेर,संजय बळीद हे या उपक्रमात सहभागी झाले होते. हा अतिशय स्तुत्य उपक्रम डॉक्टरांनी पार पडला.तसेच तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा रुग्णालयातून कुत्रा चावलेल्या रेबीज लसीचा तुटपुंज्या स्वरुपात पुरवठा केला जातो.कुत्रे चावून आलेल्या रुग्णांना मोफत रस दिली जाते.परंतू आष्टी तालुक्यातील सावरगाव,परीसरातील वेलतुरी,दौलावडगाव, गंगादेवी,शेडाळे, शेंडगेवाडी,गवखेल, उंडरखेल या गावातील अनेक कुत्रा चावलेले रुग्ण तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल होतात.रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णांना तातडीने उपचार सुरू करून रेबीज लस दिली जाते.आणि मग आरोग्य केंद्राच्या कक्षेत असलेल्या गावातील रुग्णांना लसीचा खरोखरच तुटवडा निर्माण होतो.आणि मग रेबीज लस घेण्यासाठी आलेले रुग्ण तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामावर असलेल्या डॉक्टरांशी हुज्जत घालतात,औषधे विकल्याचा बीनबुडाचा आरोप करत डॉक्टरांना त्रास देतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.या बाबींकडे अहिल्यानगर जिल्हा आरोग्य अधिकारी (dho) यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मधुमेहावरील औषधांचाही सतत तुटवडा भासत आहे.याची दखल घेउन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यासंबंधी औषधांचा तातडीने पुरवठा केला पाहिजे अशी तिसगाव परीसरातील रुग्णांची मागणी आहे.पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून अहिल्यानगर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना औषधे पुरवठा करण्याच्या तातडीने सुचना देऊन तुटवडा निर्माण झालेल्या औषधांचा त्वरित पुरवठा करावा.तसेच पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील उपकेंद्रात नेमणुकीस कर्मचारी नसल्याने सर्व सामान्य लोकांना हे उपकेंद्र आरोग्यदायी नसुन वेदनादायी वाटत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या प्रत्येक उपकेंद्रात निवासी डॉक्टरांनी राहणं हे शासनाने बंधनकारक केले असतानाही शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळगावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात निवासी डॉक्टर उपलब्ध नाहीत. सदर उपकेंद्र हे नेहमी बंद अवस्थेत राहिल्यामुळे गावातील रुग्णांची हेळसांड होत आहे.उपकेंद्रात आलेल्या रुग्णांना तातडीने उपचार पद्धती मिळत नाही अशा गावातील अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत.गावातील रुग्ण हे या उपकेंद्रात थंडी तापाच्या आजारावरील गोळ्या मागण्यांसाठी गेले असता त्यांना तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने गोळ्या मिळत नाहीत.तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला जातो.त्यामुळे कासार पिंपळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात त्वरित निवासी डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी आणि कासार पिंपळगाव,हनुमान टाकळी,कोपरे येथील नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी नागरिकांकडून सतत मागणी करण्यात येत आहे. हे आरोग्य उपकेंद्र म्हणजे गावात असुन अडचण आणि नसुन खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.गावात अनेक वेळा कॅंप लावूनही गावातील अनेक नागरिकांना शासनाचे”आयुष्यमान भारत”या योजनेचे कार्ड मिळालेले नाही असे नागरिक सांगत आहेत.या उपकेंद्रात फक्त महीन्यातील पहिल्या मंगळवारी पाच वर्षा आतील बालकांना ट्रीपल,पोलीओच्या लसीचे डोस दिले जातात.गावात सर्वत्र डासांचे साम्राज्य निर्माण झाले असतानाही मग नंतर महीनाभर या उपकेंद्रात नेमणुकीस असलेले डॉक्टर आणि परीचारीका नेमके कोठे जातात हे एक न उलगडणारे कोडेच आहे.या उपकेंद्रावर कोणाचाही वचक राहिला नसल्याने हे उपकेंद्र म्हणजे गावात एक शोभेची वस्तू बनले आहे.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या उपकेंद्रास अचानक भेट देऊन पाहणी करून येथील सेवा सुविधांबाबत माहिती करून घ्यावी म्हणजे येथे काय नको आणि काय आवश्यक आहे याची जाणीव होईल.तसेच नागरिकांना कशाप्रकारे सुविधा मिळतात याची संपूर्ण माहिती मिळेल.

























