सोयगावमध्ये निवडणूक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रूट मार्च
दत्तात्रय काटोले
सोयगाव, दी. 04 रोजी : सोयगाव तालुक्यातील सोयगाव पोलीस ठाणे हद्दीतील आमखेडा, जरंडी, तिडका व इतर ठिकाणी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने रूट मार्च आयोजित केला.
सोमवारी सकाळी पोलिस अधिकारी व कर्मचारी रूट मार्चसाठी मार्गदर्शक ठरले आणि विविध गावांमध्ये जात निवडणुकीसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली.
सोयगाव पोलिस निरीक्षक पंकज बारवलं
यांच्या मार्गदर्शनाखाली ही रूट मार्च आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस बळाने गावात प्रवेश करत, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, निवडणुकीत कोणत्याही प्रकाराच्या गडबडीला प्रतिबंध करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
पोलीस प्रशासनाच्या या कडक उपाययोजनांमुळे, आगामी निवडणुकीत शांतता व सुरक्षा राखण्यात मदत होईल, असे समजले जात आहे.
फोटो. दत्तात्रय काटोले.

























