गो. से. हायस्कूलला सत्कार समारंभ संपन्न पाचोरा-

*गो. से. हायस्कूलला सत्कार समारंभ संपन्न*
पाचोरा- *आर्ट्अँस्थेटीक्स विभाग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली* यांचे मार्फत आयोजित देशातील पहिल्या राष्ट्रीय खेळणी जत्रेत तीन हजार रुपयांचे विशेष पारितोषिक पटकावणाऱ्या भूमी जगदीश पाटील या विद्यार्थिनीचा शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सुरुवातीस साहित्यिक प्राचार्य डॉक्टर किसन पाटील यांच्या आकस्मित निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मराठी भाषा पंधरवडा सप्ताहानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळेतील शिक्षिका सी एल जाधव आणि म्युझिक थेरपी हे तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल शाळेतील शिक्षक रुपेश पाटील यांचा देखील सत्कार खलील देशमुख यांचेहस्ते करण्यात आला.
सर्व सत्कारार्थींचे संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मा.सचिव ऍड महेश देशमुख,व्हॉ. चेअरमन व्ही. टी. जोशी,शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी अभिनंदन केले असून यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी.एम वाघ पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन.आर. ठाकरे, ए बी. अहिरे,टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिनकर , कला शिक्षक एस डी भिवसाने, सुबोध कांता यन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले.