अक्षय कर्डिले यांना निवडूण आणण्यासाठी जिवाचं रान करू,पण माझ्या डाॅक्टर मुलीला मीरी जिल्हा परिषद गटात महायुती कडून उमेदवारी पाहिजे: पत्रकार सन्मान सोहळ्यात विजय कोरडे यांचा पक्षश्रेष्ठींना इशारा


(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) सन २००९ सालापासुन मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.गेल्या वेळीच्या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज दाखल करूनही पक्षाने मला थांबवलं होतं.आणि पक्षाच्या आदेशाचे पालन करीत मीही थांबलो होतो.मीरी जिल्हा परिषद गटात उमेदवारी देताना पक्षाने माझ्या वर वेळोवेळी सातत्याने अंन्यायच केलेला आहे.आगामी राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना महायुती कडून निवडूण आणण्यासाठी जिवाचं रान करू पण माझ्या डाॅक्टर मुलीला मीरी जिल्हा परिषद गटात महायुती कडून उमेदवारी दिलीच पाहिजे असा इशारा मीरी येथील राजयोग मंगल कार्यालयाचे मालक विजयकुमार कोरडे साहेब यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना दिला आहे.ते पत्रकार दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील पत्रकारांचा सन्मान सोहळा मीरी येथील राजयोग मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या महिन्यात चिचोंडी येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात असे सांगितले होते की संपूर्ण राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटातील उमेदवारीचे तिकीट देण्याची सर्व जबाबदारी ही भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे आणि भाजपचे दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या वर सोपविण्यात आली आहे. त्याबाबत त्यांचाच निर्णय अंतिम राहील त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी माझ्या कडे उमेदवारी मागण्यांसाठी येवूनये असे सांगून सर्व इच्छुकांचे कान टोचले होते.त्यामुळे आता मीरी जिल्हा परिषद गटातील उमेदवारी देण्याचा चेंडू कर्डिले,राजळे, सुजय विखे पाटील या त्रिमूर्ती च्या कोर्टात फेकून पालकमंत्री नामदार महोदयांनी उमेदवारी संदर्भात आपले हात झटकले आहेत.मीरी जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.मोहनराव पालवे आणि स्व.अनिलराव कराळे यांच्या अकाली निधनामुळे रीक्त झालेल्या जागेवर आता नवीन सोंगट्या टाकून सत्तेच्या सारीपाटाचा खेळ खेळला जाणार आहे.त्यामुळे गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मीरी जिल्हा परिषद गटात सत्ता काबीज करण्यासाठी गेल्या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दुधाने पोळलेल्या भाजपने तिकीट देताना आता ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली आहे.फक्त निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट दिले जाणार आहे.गेल्यावेळी झालेल्या चुका भाजप दुरूस्त करून या गटात आपलाच दांडा लावून आपलाच हिंदुत्ववादी भगवा झेंडा फडकावणार आहे.भाजपच्या शेवगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जाणिव ठेवून नात्या गोत्याच्या राजकारणाला आता मीरी गटात थारा दिला जाणार नाही अशी गोपनीय सूत्रांची माहिती आहे. गटाची व गणाची संपूर्ण माहिती,विकास कामे,जनसंपर्क, आर्थिक दृष्ट्या सक्षम,जनाधार, जातीनिहाय मतदार,आणि उमेदवारास किती मत पडतील,या बाबींचा सारासार विचार करून फक्त निवडून येणाऱ्यालाच संधी दिली जाणार आहे.त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्या साठी या बाबींचा सखोल अभ्यास करून पुढील रणनीती आखली जाणार आहे.विजयकुमार कोरडे साहेब यांचा या गटात असलेला जनसंपर्क,जिल्हा परिषदेतील सर्व शासकीय विकास कामांची माहिती या बाबींचा विचार करून पक्षाने माझी सुशिक्षित असलेली मुलगी डॉक्टर साक्षी विजयकुमार कोरडे यांनाच उमेदवारी दिली पाहिजे अशी सर्व सामान्य मतदारांची अपेक्षा आहे असे कोरडे साहेब यांचे म्हणणे आहे.आता नुसते गाडीत बसून गटात फेरफटका मारून थेट उंटावर बसून शेळ्या हाकणे हे चालत नाहीत तर लोकांची कामे करावी लागतात.
सदैव लोकात राहुन जमिनीवर पाय ठेवणारांनाच आता मतदार स्विकारतात हा इतिहास आहे. सत्ता मिळताच लोकांना वेठीस धरणाऱ्याचे दिवस आता संपले आहेत.अशा प्रकारे उमेदवारी मिळवण्यासाठी च्या स्पर्धेत सहभागी असणाऱ्या इच्छुकांचे कोरडे साहेब यांनी कान उपटले आहेत.भाजपला मीरी जिल्हा परिषद गटात महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर डॉक्टर साक्षी कोरडे याच उच्च शिक्षित उमेदवार निवडून येऊ शकतात असा विश्वास कोरडे साहेब यांनी व्यक्त केला आहे. कोरडे साहेब यांनी उपस्थीत सर्व पत्रकांना दोन बॅगा,पेन,डायरी, पेनड्राईव,शाल, श्रीफळ,गुलाब पुष्प आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आणि प्रीती भोजनाने या सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्यासाठी जेष्ठ नेते राजू मामा तागड, अशोक घोंगडे, रमेश डफळ, गोरक्षनाथ झाडे,शुभम मोटे,अफसर सय्यद मेजर,गणेश मोटे, कडगाव सोसायटीचे माजी चेरमन सुनिल कोरडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.विजयकुमार कोरडे साहेब यांनी सुबेच्छा देत उपस्थित सर्व पत्रकारांचे आभार मानले.

























