दहा लाख रुपये उसने न देता कर्जाच्या पैशापायी भाच्यानी कर्जबाजारी मामाला कायमचेच यमसदनी पाठवले 

दहा लाख रुपये उसने न देता कर्जाच्या पैशापायी भाच्यानी कर्जबाजारी मामाला कायमचेच यमसदनी पाठवले

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

कर्जबाजारी झालेल्या मामाला कर्ज फेडण्यासाठी भाच्याने दहा लाख रुपये उसने न देता थेट यमसदनी पाठवले घडल्याचे उघड झाले आहे.

या बाबत ची घटना अशी की पत्रकार दिनाच्या दिवशी दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिंदा या गावातील माळा वस्तीवर राहणाऱ्या हनुमंत गोरख घालमे (वय वर्षे ३५) यांचा ते आपल्या राहत्या घरी झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात टणक हत्याराने जोरदार प्रहार करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेचे कलमं १०३ (१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,यांच्या मार्गदर्शना खाली अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब,आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी साहेब यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरून या गुन्ह्याचा तपास लावला होता.त्यांनी तपासासाठी एक पोलिस पथक तयार केले होते.त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, अंमलदार हृदय घोडके,गणेश लबडे,लक्ष्मण खोकले,फुरकान शेख,शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर,अर्जुन बडे, भाग्यश्री भीटे, ज्योती शिंदे यांचा समावेश होता.पंधरा दिवसातच या गुन्ह्याचा तपास लावून संशयित आरोपीस गजाआड केले होते.या चौकशी तपासात प्रथम अशी माहिती मिळाली होती की मयत हनुमंत घालमे हे आपला भाचा तेजस रामदास अनभुले वय वर्षे (२१),राहणार घुमरी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर याच्या कडे आपल्या वर झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी भाच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते.मग पोलीसांनी भाचा तेजस अनभुले यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता मयत मामा हनुमंत घालमे यांनी आपल्या भाच्याकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते.भाचा अनभुले यांच्या आई वडिलांकडून ही मोठमोठ्या रक्कमा घेतल्या होत्या.अनेकदा त्याला पैसे दिले होते तरीही तो इतर कर्ज फेडण्यासाठी पुन्हा दहा लाख रुपयांची मागणी करीत होता.अनभुले कुटुंबानी मात्र पुन्हा पैसे देण्यास नकार दिला होता.म्हणून मयत मामा हनुमंत घालमे यांनी संशयित आरोपीच्या आई वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.त्यामुळे अतिशय चिडलेल्या आणि संतप्त झालेल्या तेजस अनभुले या भाच्याने आपला मामा हनुमंत घालमे याचा कायमचाच काटा काढून त्याला अखेरचा श्वास घ्यायला लावून थेट यमसदनी धाडले होते.मयत घालमे मामावर भले मोठे कर्ज असल्याने तो सतत आपला तेजस अनभुले या भाच्याकडे सतत पैशाची मागणी करीत असे.त्यांनी वारंवार पैसे देऊन ही पुन्हा एकदा तो दहा लाख रुपयांची मागणी करीत होता.पैसे न दिल्यास अनभुले दाम्पत्य कायमचं संपवणार अशी वल्गना केल्या मुळेच त्याला आपल्या जीवाला मुकावे लागले होते.पैशाच्या हव्यासापोटी सख्खे मामा भाचे आणि बहीण भाऊ कायमचेच एकमेकांचे हाडवैरी झाले होते.हे पोलीसांच्या तपासातून निष्पन्न झाले होते.पैसा सख्खे नातेवाईक तोडतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.