शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती अनुदानाची थेट खात्यात वर्ग
सोयगाव, दि. ५ नोव्हेंबर (प्रतिनिधी):
सप्टेंबर २०२५ मधील नैसर्गिक आपत्तीबाबत शासनाने ज्या शेतकऱ्यांची माहिती Agristack पोर्टलवर प्रमाणित झाली आहे, अशा पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे.
तथापि, काही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याचे निदर्शनास आले असून त्यामागे खालील कारणे असू शकतात –
शेतकऱ्यांनी Agristack वर नोंदणी केलेली नसणे,
नोंदणीची माहिती प्रमाणित न होणे,
आधार अद्यावत नसणे किंवा बँक खाते आधाराशी संलग्न नसणे.
या पार्श्वभूमीवर सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, शेतकऱ्यांनी आपल्या समस्येबाबत योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच आवश्यक असल्यास तहसिल कार्यालयातील जनकल्याण कक्षात संपर्क साधून अचूक माहिती प्राप्त करून घ्यावी, असे सोयगाव तहसीलदार सौ. मनीषा मेने यांनी आवाहन केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, “शासन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध आहे. पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी सर्व अधिकारी दक्ष राहतील.”
























