श्री.गो.से.हायस्कूल.पाचोरा विद्यार्थ्यांची क्षेत्रला भेट
आज दिनांक 20 जानेवारी 2026 मंगळवार रोजी श्री.गो.से.हायस्कूल.मधील विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5वी च्या “परिसर अभ्यास” विषयातील “पाणी”या प्रकरणावर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्पाची अधिक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी पाचोरा नगर परिषदेचे गणेश कॉलनी मधील जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देण्यात आली.
प्रकल्प अधिकारी श्री.समीर पिंजारी,श्री.संजय बागुल,श्री.एकनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना जलशुद्धीकरण प्रक्रिया व नियोजन याविषयीची अधिक माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले व जलशुद्धीकरण प्रक्रिया समजून घेतली.
या क्षेत्रभेटी साठीचे मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील. यांनी केले. पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल,पर्यवेक्षक श्री.आर.बी.तडवी,पर्यवेक्षक श्री.राजेश बांठिया.या सर्वांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या क्षेत्रभेटीसाठी श्री.विजय पाटील,श्री.सागर पाटील,श्री.संदीप चौधरी,श्री.मयुरेश देवरे,श्री.रुपेश पाटील, श्री चंद्रकांत पाटील,श्री.विशाल बागुल,श्री.सागर थोरात, श्रीमती.चंदा चौधरी,श्रीमती संगीता लासुरकर मॅडम या सर्वांनी मेहनत घेतली.
जलशुद्धीकरण प्रकल्प अधिकाऱ्यांचे आभार श्री.रुपेश पाटील सर यांनी मानले.

























