खासदार उन्मेशदादा पाटील यांची 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा उद्घाटनप्रसंगी व्यक्त मिश्किल टिप्पणी

जळगावच्या जिल्हयाच्या राजकीय नाटयाचा नाट्यगृहासाठीच्या निधीवर कुठलाही परिणाम होणार नाही

खासदार उन्मेशदादा पाटील यांची 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा उद्घाटनप्रसंगी व्यक्त मिश्किल टिप्पणी
—————–
जळगाव – संभाजीराजे नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग करताना विजबिलाचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर समस्या होऊन बसला आहे. जेष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील यांनी ही समस्या सोडवण्यासाठी मला विनंती केली आहे.येत्या काळात आमदार राजू मामा भोळे, आमदार चंदुभाई पटेल यांच्यासह अनेकांचा निधी घेऊन नाट्यगृहाच्या छतावर सोलर युनिट बसवून हा विजबिलाचा प्रश्न मार्गी लावता येईल का याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अंतिम निर्णय घेण्यास भाग पाडतो. सध्या राजकारणात पुढाऱ्यांची नाट्य स्पर्धा सुरू असून या जळगावच्या जिल्हयाच्या राजकीय नाटयाचा नाट्यगृहासाठीच्या निधीवर कुठलाही परिणाम होणार नाही.असे सडेतोड प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज संभाजी राजे नाट्यगृहात व्यक्त केले. आज ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे नाट्यगृह ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तर खासदार उन्मेश दादा पाटील तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजु मामा भोळे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काय म्हणाले खासदार उन्मेशदादा पाटील