Home पाचोरा पाचोऱ्यात श्री.गो.से.हायस्कूलला जागतिक पर्यावरण दिन साजरा

पाचोऱ्यात श्री.गो.से.हायस्कूलला जागतिक पर्यावरण दिन साजरा

पाचोऱ्यात श्री.गो.से.हायस्कूलला जागतिक पर्यावरण दिन साजरा

 

 

 

 

पाचोरा-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचोरा सामाजिक वनीकरण विभागाच्या विद्यमाने श्री.गो.से.हायस्कूल येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि निसर्ग संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

यावेळी शाळेचे पर्यवेक्षक महेश कौंडिण्य, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर,सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल गो. रा. बडगुजर,वनपाल उल्हास स. पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वनक्षेत्रपाल गोरा बडगुजर यांनी १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण परिषदेनंतर या दिवसाची सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगताना पर्यावरण दिवसाचे महत्त्व आपल्या मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी केले तर आभार विशाल बागुल यांनी मानले.

यावेळी रुपेश पाटील,विशाल बागुल, बबनराव पाटील, श्रीकांत अहिरे,अंकुर पाटील,वनपाल योगेश गो. दिक्षित,वनरक्षक रवींद्र ल.ठोसर,ऑपरेटर प्रकाश पाटील पाचोरा,निलेश शिंदे, सागर महाजन, जावेद शेख आदी उपस्थित होते.

Don`t copy text!