Home पाचोरा तालुका गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांची ४८६ व्या...

गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांची ४८६ व्या जयंतीनिमित्त मानवंदना…!!!!

गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांची ४८६ व्या जयंतीनिमित्त मानवंदना…!!!!

 

कोळगाव ता.भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रशांत पाटील यांनी केले,त्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव उपस्थितांना करुन दिली.

तद्नंतर प्रभारी कार्यवाहक आर.ए.पाटील,एस.आर.सोनवणे, एम.ए.पवार, विठ्ठल सोनवणे आदींच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य आर आर वळखंडे,पर्यवेक्षक बी.डी. साळुंखे,प्रभारी कार्यवाहक आर.ए.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.

Don`t copy text!