पाचोरा कन्या विद्यालयात विद्यार्थिनींचे सवाद्य स्वागत 
( पाचोरा) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयात आज दिनांक 15 जून रोजी, फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत विद्यार्थिनींचे सवाद्य स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी संपन्न झालेल्या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थिनींचे सवाद्य स्वागत करताना त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. स्थानिक नगरसेविका सौ. प्रियंका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर गजानन जोशी महाराज, प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक अनिल पवार उपस्थित होते.
नगरसेविका सौं. प्रियंका पाटील यांच्या हस्ते नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांना मिठाई भरवण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय गणवेश, स्पोर्ट गणवेश, पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य, स्कूल बॅग देऊन गौरविण्यात आले.
उपस्थित सर्व विद्यार्थिनींना सुद्धा मिठाई वाटप करण्यात आली.. या निमित्ताने शालेय पोषण आहारात गोड मेनू देण्यात आला.
प्राचार्य डॉ शिवाजी शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थिनींचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या व विद्यार्थिनींकडून शिक्षणाची प्रतिज्ञा म्हणवून घेतली. शाळेतील नवीन प्रशस्त स्वच्छतागृह, डिजिटल क्लासरूम, कार्यालयाचे व वर्गांचे सुशोभीकरण, सोलर पॅनल, संगणक कक्ष आदी सेवा सुविधांबाबत नगरसेविका सौ. प्रियंका पाटील यांनी संस्थेचे व शाळेचे मुक्तकंठाने कौतुक केले. विद्यार्थिनींनी चिकाटीने, मेहनतीने अभ्यास करून शाळेचा व आई-वडिलांचा नावलौकिक वाढवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रा. अंकिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. प्रतिभा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयदीप पाटील, अंबालाल पवार, नंदू पाटील, सुरेखा बडे, प्रा संगीता राजपूत, उमेश कडलग, संगीता बाविस्कर, पायल पाटील, शिवराम पाटील, धनराज धनगर शकील खाटीक आदींनी परिश्रम घेतले






















