गरीब होतकरू विद्यार्थ्याचे पालकत्व अँड . राजेश गिरी यांचेकडून स्वीकार; रामजीनगर जिल्हापरिषद शाळेत माजी विद्यार्थी संघाची निवड
दत्तात्रय काटोले, सोयगाव : प्रतिनिधी
सोयगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामजीनगर येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राजेश गिरी, कृषिभूषण अरुण सोहनी, शालेय समिती अध्यक्ष मनोज (राजू) कुडके, दत्तु जोहरे, सागर इंगळे, समाधान सोनवणे, ज्ञानेश्वर जाधव, शंकर जेठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एक प्रशंसनीय पाऊल उचलत अॅड. राजेश गिरी यांनी गरीब होतकरू व हुशार विद्यार्थ्याचे पालकत्व स्वीकारत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घातले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कृषिभूषण अरुण सोहनी यांनी “विद्यार्थी कॉलरशिप क्लब” मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेमध्ये राजू कुडके यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रघुनाथ काटोले सर व सहशिक्षक गोपाळ चौधरी सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सोयगाव परिसरात शिक्षण क्षेत्रातील हा उपक्रम कौतुकास्पद ठरला असून, माजी विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे शाळेला नवी ऊर्जा मिळाल्याचे निश्चितच जाणवत आहे.

























