श्री.गो.से.हायस्कूल.पाचोरा.येथे पाककृती स्पर्धा संपन्न

श्री.गो.से.हायस्कूल.पाचोरा.येथे पाककृती स्पर्धा संपन्न….. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित

 

श्री.गो.से.हायस्कूल येथे आज दि. 8/2/2025 शनिवार रोजी शासनाच्या निर्देशानुसार पाककृती स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थीनींमध्ये पाककला विकसित होऊन विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत इयत्ता 8वी व9 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

विद्यार्थीनींनी बनविलेल्या विविध स्वादिष्ट, रुचकर पदार्थांचे सेवन करुन पहिले तीन विजेते जाहीर करण्यात आले.त्यात

प्रथम क्रमांक कु. लक्ष्मी प्रशांत कोळपकर.8वी-ड (केक),

द्वितीय क्रमांक कु.तनीषा उमेश खेडकर.8वी-क(भगरचिला)व

तृतीय क्रमांक कु.देवांशी राजेशभाई सावलीयाॅं.8वी-फ(रवा आप्पे)

सदर स्पर्धेचे परीक्षण विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती आर.बी.पवार.मॅडम व श्रीमती प्रज्ञा सावळे मॅडम यांनी केले.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील., पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे तसेच शिक्षक बंधू व भगिनी उपस्थित होते.