श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांचा एस. एस. सी दहावीचा परीक्षेच्या निकाल जाहीर यशाची परंपरा कायम

श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांचा एस. एस. सी दहावीचा परीक्षेच्या निकाल जाहीर शेकडा निकाल 95.90% यशाची परंपरा कायम

 

 

 

पाचोरा ( प्रतिनिधी)

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित श्री.गो.से हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने आपली यशाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयातून प्रथम क्रमांक चौधरी भाग्यश्री सुनील 95.60, द्वितीय क्रमांक पाटील मानसी सुनील 95.20, तृतीय क्रमांक कुमावत ईश्वरी ज्ञानेश्वर 94. 80 चतुर्थ क्रमांक बोरुडे वैष्णवी बाळू 94. प्रविष्ट विद्यार्थी 440 , विशेष प्राविण्य 145, प्रथम श्रेणी 187, द्वितीय श्रेणी 83, फर्स्टक्लास 7 शेकडा निकाल 95 .90. असा निकाल लागला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन, मुख्याध्यापक एन. आर.ठाकरे उपमुख्याध्यापक आर एल पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख एस एन पाटील, कनिष्ठ विभाग मनीष बाविस्कर, वरिष्ठ लिपिक अजय सिनकर, यांनी अभिनंदन केले.