नासिक राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत रंगश्री च्या दोन विद्यार्थीनी झळकल्या

नासिक राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत रंगश्री च्या दोन विद्यार्थीनी झळकल्या

पाचोरा ( प्रतिनिधी )
नाशिकच्या आय. डी. टी या संस्थेने आकार राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून 600 पेक्षा जास्त संस्थानी संस्थानी सहभाग घेऊन जवळपास 7ते 8 हजार चित्र काढून पाठविण्यात आली.या मधून फायनल राउंड साठी 300 चित्र निवडण्यात आली.यातूनच विविध गटासाठी पारितोषिक प्राप्त चित्रे निवडली गेली.
रंगश्री आर्ट फाउंडेशन पाचोरा या ड्रॉईंग अँड पेंटिंग क्लासेस ने देखील 20चित्रे स्पर्धेसाठी पाठविली होती . यातून रंगश्री च्या दोन विद्यार्थीनी राजनंदिनी विनोद जाधव जाधव.. गट 11वी -12 वी मध्ये द्वितीय क्रमांकाचे 4100/-रु.
व कोमल भगवान चौधरी FY-TY गटातून तृतीय क्रमांकाचे 4100/-*पारितोषिक,शिल्ड प्रमाणपत्र मिळवून आभिमानास्पद कामगिरी केली आहे.
या स्पर्धेसाठी परीक्षण आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफ्फुल सावंत,चित्रकार भालेराव सर,आयडीटीचे संचालक महेंद्र शेवाळेआदी कलावंत मंडळींनी केले.
कोमल चौधरी ही पाचोरा पोलीस स्टेशन मधील हेड कॉन्स्टेबल श्री भगवान सिताराम चौधरी यांची सुकन्या आहे. या अगोदर कोमलने सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल प्रदर्शनातही चित्र पाठवले व त्या प्रदर्शनात तिचे चित्र लावण्यात आले होते.
कोमल चौधरी ही पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालय व राजनंदिनी जाधव ही आदर्श कन्या महाविद्यालय, भडगाव येथे शिकत आहे. या दोघींना श्री.सुबोध मुरलीधर कांतायन (कलाशिक्षक – श्री. गो से. हायस्कुल, पाचोरा) सरांचे मार्गदर्शन मिळाले.
त्या दोघेही विदयार्थिनींचे परिसरातुन कौतुक होतं आहे.