भारतीय खो-खो महासंघाच्या अध्यक्षपदी दिल्लीचे सुधांशू मित्तल तर महासचिवपदी पंजाबचे उपकार सिंह विर्क बिनविरोध

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

भारतीय खो-खो महासंघाच्या अध्यक्षपदी दिल्लीचे सुधांशू मित्तल तर महासचिवपदी पंजाबचे उपकार सिंह विर्क बिनविरोध

 

भारतीय खो-खो महासंघाच्या तिजोरीच्या चाव्या महाराष्ट्राच्या हाती!

 

ॲड. गोविंद शर्मा खजिनदारपदी, तर अश्विनी पाटील यांची सदस्यपदी बिनविरोध निवड!

 

नवी दिल्ली (क्रीडा प्रतिनिधी) – भारतीय खो-खो महासंघाची २०२५ ते २०२९ या कार्यकालासाठीची निवडणूक अत्यंत सुसंवादाने आणि बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्राने मोठी घोडदौड करत, महासंघाच्या खजिनदारपदाची तिजोरी आपल्या हाती घेतली आहे. अध्यक्षपदी दिल्लीचे सुधांशू मित्तल तर महासचिवपदी पंजाबचे उपकार सिंह विर्क यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी माजी न्यायाधीश कामिनी लाऊ यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले.

 

महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो महासंघाच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली. याच वेळी, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ. अश्विनी पाटील याही सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्या. गेल्या दोन ते तीन कार्यकालानंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा महासंघाचे खजिनदारपद मिळाले असून, कै. महेश मेढेकर यांच्या नंतर ही जबाबदारी पुन्हा महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे.

 

याआधीही ॲड. गोविंद शर्मा यांनी भारतीय खो-खो महासंघाच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी (१३ ते १९ जानेवारी २०२५) भारतीय संघाच्या निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे यशस्वीरित्या पार पडली.

 

ॲड. शर्मा हे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सचिव, भारतीय खो-खो महासंघाचे कार्यकारी सदस्य असून त्यांनी २०१६ मध्ये महासंघाच्या पुरस्कार समिती सदस्य, खेलो इंडिया स्पर्धेचे विभागीय सदस्य, नेपाळविरुद्ध झालेल्या कसोटीतील प्रशिक्षक, आशियाई स्पर्धेतील तांत्रिक अधिकारी, तसेच गुवाहाटी (२०२३) स्पर्धेतील निवड समिती सदस्य अशा अनेक भूमिका यशस्वीरित्या निभावल्या आहेत. २०१६ पासून ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड समिती सदस्य म्हणून सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा क्रीडा उत्कृष्ट संघटक पुरस्कार, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (छत्रपती संभाजीनगर) यांसह अनेक मानसन्मान मिळाले आहेत.

 

त्यांच्या आणि अश्विनी पाटील यांच्या या निवडीबद्दल मा. ना. अजितदादा पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संजिवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, समीर मुळे, सचिन गोडबोले, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, मा. आमदार अनिकेत तटकरे, महेश गादेकर, अशोक पितळे, आमदार अभिमन्यू पवार, सौ. ग्रीष्मा पाटील, माजी सरचिटणीस संदीप तावडे, डॉ. राजेश सोनावणे, डॉ. पवन पाटील, जयांशु पोळ, बाळासाहेब तोरसकर, सौ. वर्षा कच्छवा आदी मान्यवरांनी मन:पूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

बिनविरोध निवड झालालेले पदाधिकारी व सदस्य खालील प्रमाणे.

अध्यक्ष – सुधांशू मित्तल (खो खो असोसिएशन ऑफ दिल्ली)

उपाध्यक्ष – भवर सिंह पलारा (राजस्थान खो-खो असोसिएशन), कल्याण चाटर्जी (प. बंगाल खो-खो असोसिएशन), कमलजीत अरोरा (छत्तीसगड अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशन), लोकेश्वर (कर्नाटक स्टेट खो-खो असोसिएशन), एम. मधुसूदन सिंह (मणिपूर अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशन), एम. सीता रामी रेड्डी (आंध्रप्रदेश खो-खो असोसिएशन), प्रद्युमना मिश्रा (ओडीसा खो-खो असोसिएशन), राजीब प्रकाश बारुआ (आसाम खो-खो असोसिएशन).

महासचिव – उपकार सिंह विर्क (पंजाब खो-खो असोसिएशन)

खजिनदार – गोविंद शर्मा (महाराष्ट्र खो-खो असोसिएशन)

सहसचिव – ए. नेल्सन सॅम्युएल (तामिळनाडू गेम खो-खो असोसिएशन), एल. आर. वर्मा (हिमालय प्रदेश खो-खो असोसिएशन), संजय यादव (मध्य प्रदेश अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशन), सुनील नाईक (आॅल गोवा खो-खो असोसिएशन).

कार्यकारी सदस्य – अॅथलेट कमिशन – अश्विनी बिपीन पाटील (महाराष्ट्र खो-खो असोसिएशन), मोनिका

कार्यकारी सदस्य – अमरीन्द्र पाल सिह (जम्मू अॅण्ड काश्मीर स्टेट खो-खो असोसिएशन), अनुप चक्रवर्ती (सिक्कीम खो-खो असोसिएशन), बिजन कुमार दास (प. बंगाल खो-खो असोसिएशन), गुरचंद (पंजाब खो-खो असोसिएशन), बिजन कुमार दास (प. बंगाल खो-खो असोसिएशन), एम.व्हि.एस.एस. प्रसाद (आंध्रप्रदेश खो-खो असोसिएशन), नीरज कुमार (खो-खो असोसिएशन ऑफ बिहार), एन. कृष्णमूर्ती (तेलंगना खो-खो असोसिएशन), प्रमोद कुमार पांड्ये (खो-खो असोसिएशन ऑफ दादरा अॅण्ड नगर हवेली), पुटो बुई (खो-खो असोसिएशन ऑफ अरूणाचल प्रदेश), रजत शर्मा (उत्तरांचल क्षेत्र खो-खो असोसिएशन), संजीव शर्मा (चंदिगड खो-खो असोसिएशन), संतोष प्रसाद (झारखंड स्टेट खो-खो असोसिएशन), सूर्य प्रकाश खात्री (खो-खो अस्सोसिएशन ऑफ दिल्ली)