पोलीस सबइन्स्पेक्टर शी प्रेमसंबंध असलेल्या बेपत्ता परिचारिकेचा म्रृतदेह विहीरीत आढळला,कुंपणानेच शेत खाल्लं,न्याय मागायचा कुणाकडं,चिठ्ठीत आढळली”आपबीती”ची प्रेमकहाणी!
(सुनिल नजन”चिफ ब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा) पोलीस खात्यात नोकरी करत असतानाच एका परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.यथेच्य उपभोग घेतल्यानंतर तीने लग्नाची मागणी केली असता तीला मध्येच सोडून दिले.वैफल्यग्रस्त झालेल्या परीचारीकेने अखेर आत्महत्या केली.घरच्यांनी मात्र बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.अखेर मृतदेह विहिरीत आढळला मग पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.”सद् रक्षणाय,खल निग्रहणाय” हे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचाच हा प्रताप असल्याचे दिसून आल्याने पोलिस खात्याची लक्तरे चांगलीच वेशीवर टांगली गेली आहेत. या बाबतची घटना अशी की पढेगाव येथील एक पस्तीस वर्षीय तरूणी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एका दवाखान्यात परिचारिका(नर्स) म्हणून काम करीत होती.तीचे त्याच भागातील पोलिस स्टेशनमध्ये सेवेत असलेल्या एका सब इन्स्पेक्टरशी प्रेम संबंध जुळले.हा पोलिस अधिकारी मुळचा अकोला जिल्ह्यातील आहे.पण त्याची बदली पुण्यातील पिंपरी चिंचवड या भागात आहे.या पोलिस अधिकाऱ्याशी या तरुणीचे प्रेमाचे सुत जुळले. दोघांनी अनेक वेळी मौजमजा केल्यानंतर सदर परीचारीकेने (नर्स) या पोलिस अधिकाऱ्याच्या मागे लग्न करण्याचा सारखा लकडा लावला होता.मात्र मनिष मोगरे नावाचा पोलिस सब इन्स्पेक्टर तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता.तो आपला पोलिस मित्र असलेल्या गजानन थाटे यांच्या मार्फत हे लग्न होऊनये म्हणून जास्त प्रयत्न करत होता. मोगरे आणि थाटे हे दोघेही पोलिस दलात कार्यरत आहेत.लग्नही होत नाही आणि मनिष मोगरे यांनीही प्रेम संबंध तोडल्यामुळे सदर तरूणीने अखेर वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली.या घटनेत आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका दवाखान्यात परीचारीकेचे काम करत असताना सदर तरुणी ही होस्टेलमध्ये रहात होती. घरातील माणसांनी अनेक वेळा तीला लग्नाबाबत विचारले असता तिने लग्न करण्यास टाळाटाळ केली.नंतर मात्र माझे एका मुलांसोबत प्रेम संबंध असुन आम्ही लवकरच लग्न करणार आहोत असे तीने घरच्यांना सांगितले होते. लग्नास नकार दिल्याने अखेर वैफल्यग्रस्त झालेली ही तरुणी ८ फेब्रुवारी रोजी पढेगाव येथील आपल्या घरी आली होती.पण ती प्रेम संबंधात ब्रेक अप मिळाल्याने सारखी बडबडत करत होती.त्यामुळे तीच्या घरचे लोक तीला एका मनो रूग्णालयातील तज्ञ डॉक्टराकडे दाखल करणार होते.पण त्या पुर्वीच रात्री भल्या पहाटे पहाटे ती घरातून अचानक बेपत्ता झाली होती.ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती.दि.२२ रोजी तीचा मृतदेह एका विहिरीत सापडला होता. संबंधित पोलिस स्टेशनमध्ये तीच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.अंत्यसंस्कार झाल्यानंतर तीचे सर्व नातेवाईक ती जेथे नोकरीला होती त्या ठिकाणी जाऊन तीचे सर्व सामान घेऊन घरी आले होते.घरी आल्यावर तीच्या बॅगा तपासल्या असता त्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली होती.त्या चिठ्ठीत सदर तरुणीने पि एस आय मनिष मोगरे (अकोला) यांच्याशी लग्न करणार असल्याचे लिहुन ठेवले होते.परंतू मोगरे याने सदर तरुणीशी लग्नास नकार देऊन प्रेम संबंध तोडले होते.ही माहिती मिळाली.तसेच पोलिस गजानन थाटे व पि एस आय मनिष मोगरे याला माफ करू नका असेही चिठ्ठीत लिहून ठेवले असल्याची माहिती मिळाली.या चिठ्ठीच्या आधारे सदर मयत तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून मनिष मोगरे आणि गजानन थाटे या दोघांच्या विरोधात सदर तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे.कुंपणाणेच शेत खाल्लं आता न्याय मागायचा कुणाकडं हा फार मोठा यक्षप्रश्न मयत तरुणीच्या नातेवाईकां समोर उभा राहिला आहे.संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.मयत तरुणीला खरोखर न्याय मिळेल काय? असा प्रश्न सर्रास विचारला जात आहे.प्रेमप्रकरण करणाऱ्या महाभागांनी या घटनेतून बोध घेतला पाहिजे.

























