संयुक्त सचिव पदी कॉ.विरेंद्रसिंग पाटील

संयुक्त सचिव पदी कॉ.विरेंद्रसिंग पाटील

महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन नाशिक येथे दि.१०/११/१२ फेब्रुवारी २०२३ या तीन दिवसांत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष कॉ.मोहन शर्मा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री.शरद पवार,कॉ.अतुलकुमार अंजान शेतकरी आंदोलन प्रणेते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.देशपातळीवरील वीज उद्योगांचे खाजगीकरण व फ्रैचाईझीकरण रद्द करण्याची तसेच समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध,वीज कायदा सुधारणा विधेयक मंजूरीस विरोध या सह अनेक विषयांवर महत्वपूर्ण ठराव करण्यात आले*संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ.सी.एन.देशमुख, सरचिटणीस कॉ.कृष्णा भोयर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.जळगाव परिमंडळ तर्फे सक्रीय पदाधिकारी सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांच्या संघटनेतील योगदान कार्य याची दखल घेऊन त्यांची राज्य संयुक्त सचिव पदावर पदोन्नती देऊन निवड करण्यात आली.संघटनेचे जळगाव जिल्ह्यातील नेते कॉ.जे.एन.बाविस्कर यांची चेअरमन ऑडिट कमिशन,कॉ.देविदास सपकाळे,कॉ.जितेंद्र अस्वार,कॉ.प्रकाश कोळी यांना केंद्रीय कार्यकारिणी सदस्य पदावर तसेच कॉ.श्रीमती संध्या पाटील यांना महिला आघाडीच्या कार्यकारिणी सदस्य पदावर ,कॉ.पी.वाय पाटील केंद्रीय सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली असून संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाने जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक कामाची नोंद घेतली त्या बद्दल समाधान व्यक्त केले आहे.जळगाव सर्कल सेक्रेटरी कॉ.दिनेश बडगुजर,खडका पारेषण सर्कल सेक्रेटरी अविनाश तायडे,सर्कल खजिनदार कॉ.विलास तायडे,सर्कल प्रसिद्धी प्रमुख कॉ.सागरराज कांबळे, कॉ.रविंद्र गायकवाड,कॉ.स्वप्निल बाविस्कर,कॉ.किशोर जगताप,कॉ.शरद बारी,कॉ.प्रभाकर महाजन,कॉ.गोकुळ सोनवणे,कॉ.गजानन साबळे यांनी तसेच सर्व सभासद पदाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे