स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल,पारध येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल,पारध येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

 

पारध, ता.१७ : (महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी)

स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,पारध शाहूराजे तालुका भोकरदन येथे भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

शाळा म्हणजे केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच त्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळावा या उद्देशाने निबंध,गायन व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

 

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांचे सुंदर सादरीकरण केले, तर काहींनी रंगरेषांमधून कल्पकतेने रेखीव चित्रे साकारली. स्पर्धेतील सर्वच सहभागी विद्यार्थ्यांनी आपली कला खुलवून दाखवली.

 

कार्यक्रमाच्या शेवटी श्री मनीष भैया श्रीवास्तव माजी जि.प. सदस्य,श्री शेखर भैया श्रीवास्तव उपसरपंच पारध, श्री विक्रांतभैया श्रीवास्तव तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.लक्कस सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भविष्यात अशा स्पर्धांत अधिकाधिक सहभाग घेण्याचे मार्गदर्शन केले.

या विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी श्री रवी तबडे सर, श्री सूर्यकांत गालफाडे सर, श्री दत्ता पाखरे सर, राधिका राऊत मॅडम, लोखंडे मॅडम,स्मिता भारती मॅडम तसेच शाळेतील सर्व महिला शिक्षिका आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.