कासार पिंपळगाव आणि हनुमान टाकळी येथे विषेश ग्रामसभा संपन्न

कासार पिंपळगाव आणि हनुमान टाकळी येथे विषेश ग्रामसभा संपन्न

 

 

 

 

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील

 

कासार पिंपळगाव आणि हनुमान टाकळी येथे विषेश ग्रामसभा संपन्न झाली.कासार पिंपळगाव येथे गावच्या सरपंच सौ मोनालीताई राजळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ९ वाजता विषेश ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रामसभे मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविणे,समित्या तयार करून त्या अनुषंगाने विविध कामे करणे,या अभियानामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अभियानाच्या मुख्य ७ घटकावर काम करण्याचे सर्वानुमते ठरले.यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ प्रशासन,सक्षम पंचायत, जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव निर्माण करणे,मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोक सहभागातून श्रमदान या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे या सर्व बाबीवर मुद्देसूद सविस्तर चर्चा करण्यात आली.सरकारी अजिंठ्या वरील खालील विषय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजनेतील अपात्र लाभार्थी वगळणे, सेवा पंधरवडा साजरा करणे, ग्रामीण रस्ते, पाणंद रस्ते, शेत रस्ते,पायवाट रस्ते या सर्व ग्रामरस्त्यांचा आराखडा करणे व त्यासाठी समिती स्थापन करणे. तसेच ऐन वेळच्या विषयांमध्ये गावातील ओढे, नाले अतिक्रमण मुक्त करणे, गावामध्ये रोड रोमिंयो, सार्वजनिक ठिकाणी गोवा मावा गुटखा खाऊन घाण करणाऱ्या टग्यांचा बंदोबस्त करणे, बिबट्यापासून संरक्षण व्हावे यासाठीची उपाययोजना करणे,गावातील खराब झालेल्या विविध रस्त्यांची दुरुस्ती करणे, गावामध्ये, जनावरांच्या गोठ्यामध्ये औषध फवारणी करणे,सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीचे आणि हाणी झालेल्या पशुधनाचे, घराच्या पडझडीचे, पंचनामे करणे, गावावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीला सर्व युवकांनी बचाव कार्याद्वारे उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सर्व घटकांच्या समाज सेवेसाठी एकी दाखविल्या बद्दल व सरपंच मोनालीताई राजळे यांनी या सर्वां सोबत दिवसभर थांबून बचाव कार्यासाठी युवकांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचेही या ग्रामसभेमध्ये अभिनंदन करण्यात आले.या ग्रामसभेसाठी ग्रामपंचायत सदस्य,ज्येष्ठ नागरिक,भजनी मंडळ,गावातील युवक, बचतगटातील, महिला,गावातील विविध विभागाचे कर्मचारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.हनुमान टाकळी येथेही सरपंच सौ शिरसाठ मॅडम आणि ग्रामसेविका पुष्पा गायके(शिंदे) मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली ही विषेश ग्रामसभा पार पडली.वरील सर्व विषय हाताळण्यात आले.गावातील नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपरीवर्तन कमेटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील विविध विकास कामावर चर्चा झाली.शिव पाणंद रस्त्याच्या कामासाठी समिती स्थापन करण्यात आली. दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी या सभेसाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.