करियर गायडन्सवर 26 एप्रिल रोजी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

करियर गायडन्सवर 26 एप्रिल रोजी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

जळगाव, दिनांक 20  : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव या कार्यालयामार्फत बुधवार 26 एप्रिल, 2023 रोजी दुपारी 12.00 ते 12.30 या वेळेत मॉडेल करिअर सेंटरद्वारा Guidence Related soft skill Training/NCS Portal या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन सत्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे मॉडेल करिअर सेंटर द्वारा कु. सीमा शर्मा, यंग प्रोफेशनल या मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यात आले आहे.
गुगल मिट लिंक खालीलप्रमाणे.
गुगल मिट लिंक – meet.google.com/dhy-oggc-yxd
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी या सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र. जळगांव यांनी केले आहे.