तारखेडा येथे अवैधरित्या साठविलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर छापा : 26 लाखाचा मुद्देमाल केला जप्त

 तारखेडा येथे अवैधरित्या साठविलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर छापा : 26 लाखाचा मुद्देमाल केला जप्त.

सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख (भा.पो.से), उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग, चार्ज पाचोरा उपविभाग यांना गुप्त बातमी मिळाली कि पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत तारखेडा खु. या गावी एका गोडाऊनमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला, टोबॅको सदृश बंदी असलेली तंबाखु, राजनिवास सुगंधित पानमसाला सागर पानमसाला, अशाप्रकारचा प्रतिबंधित असलेला मुद्देमाल साठवुन ठेवलेबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्यानुसार त्यांनी व त्यांच्या पथकातील पो.ना. 1405 राजेंद्र निकम, पो.शि.946 अजय पाटील, पो.शि. 3384 महेश बागुल यांनी तात्काळ त्याठिकाणी छापा टाकला. त्यानंतर पाचोरा पोलीस ठाणेचे जास्तीचे मनुष्यबळ बोलावुन त्याठिकाणी सविस्तर पंचनामा करुन सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुन मुद्देमाल : 26, 86, 368/-रुपये किंमतीचा आहे. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला गु.र.नं. 38/2023 भा.दं.वि कलम 328,188,272,273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे व पथक करीत आहे. सदर गुन्ह्यात एकुन 3 आरोपी असुन एक आरोपी हा अटकेत असुन इतर दोन आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक जळगाव एम राजकुमार अप्पर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे (म.पो.से ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.