१६ ऑगस्ट २०२१ रोजी ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान महाबैठक- मेळावा पाचोरा येथे. जिल्हाभरातून ओबीसी समाजातील प्रमुख ओबीसी समाज बांधव राहणार उपस्थित

चलो पाचोरा.जिल्हा.जळगाव
चलो पाचोरा.जिल्हा.जळगाव

ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियानची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून प्रथम टप्पा सुरुवात.

१६ ऑगस्ट २०२१ रोजी ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान महाबैठक- मेळावा पाचोरा येथे. जिल्हाभरातून ओबीसी समाजातील प्रमुख ओबीसी समाज बांधव राहणार उपस्थित.

पुरोगामी विचारसरणीचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे नाथाभाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. याचा प्रथम टप्पा जळगाव जिल्हा महाबैठक- मेळावा मधून सुरुवात होत आहे.जळगाव जिल्ह्याची ओबीसी महाबैठक-मेळावा दिनांक १६ ऑगस्ट २०२१ रोजी येथे आयोजित करण्यात आला आहे.०२:०० ते ०६:००.स्वर्गवासी.राजीव गांधी टाऊन हॉल, दुसरा मजला , मानसिंगका कॉर्नर, शिवाजी चौक, पाचोरा –४२४२०१ येथे आयोजित करण्यात आला आहे.

ओबीसी नेते अनिलभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाभरातील सर्व ओबीसी- बहुजन समाजातील समाज बांधव ह्या महाबैठक मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सुप्रीम कोर्टाने रद्द केलेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा आबाधित करा या मागणीसाठी सर्वपक्षीय ओबीसी समाजातील प्रमुख लोक पाचोरा येथे मेळावा मध्ये एकत्र येऊन विचारविनिमय करून पुढील दिशा ठरवणार आहेत. ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान ओबीसींच्या हितासाठी ओबीसी समाजाच्या अनेक राजकीय आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्याच काम करणार आहे. सदर महाबैठक- मेळावा हा सर्व ओबीसी बहुजनांसाठी आहे. कोणीही निमंत्रणाची वाट पाहू नये आपल्या हक्कासाठी आपल्या अस्तित्वासाठी जिल्हाभरातून सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र यावे हीच ती वेळ आपले संघटन कौशल्य दाखविण्याची आहे. आता नाही तर कधीच नाही आपली पुढील पिढीला भविष्य उरणार नाही. जळगाव जिल्ह्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ओबीसी राजकीय आरक्षण बचाव महाबैठक मेळाव्याला उपस्थित राहावे असे आव्हान ओबीसी नेते व ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना केले आहे.

अठरापगड जाती,बाराबलुतेदार,आलुतेदार समाजावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील शिष्यवृत्तीचा विषय असेल प्रत्येक ठिकाणी यांना संघर्ष करावा लागतो. ओबीसी समाजातील माळी, धनगर वंजारी ,तेली ,तांबोळी,धोबी, परीट, सोनार, कुणबी ओबीसी मधील सर्व मुख्य घटकाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. राज्यभरात ओबीसी समाजाच्या अनेक लहान मोठ्या संघटना आप आपल्या परीने ओबीसी चे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी पर्यन्त करत आहे. प्रत्येक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. ओबीसी समाजाला देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनीच मंडल आयोग लागू करून आरक्षण मिळवून दिले आहे आणि आता सुद्धा पवार साहेबच ओबीसीचे रद्द झालेल्या राजकीय आरक्षण शरद पवार साहेब मिळवून देतील यात काही शंका नाही. यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत यासाठी आपल्याला या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नाथाभाऊ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आपली ओबीसी बांधवांची एकी दाखवायची आहे.