पाचोरा ग्रामीण रुग्णालया विरोधात हरीभाऊ पाटील यांच्या आमरण उपोषण करण्याचा इशारा

पाचोरा : येथील ग्रामीण रुग्णालयात १० मे रोजी एक महिला डीलव्हेरी साठी आली असून महिलेची डीलव्हेरी झाल्यानंतर जन्म झालेल्या नवजात बाळाचा ऐका नर्सच्या हलगर्जीपणा मुळे मुत्यु झाला होता.या वेळी बाळाच्या आई वडिलांनी नर्सच्या विरोधात आक्रोश केला होता.नर्सच्या हलगर्जीपणा मुळे बाळाचा मुत्यु झाला असा आरोप केला आहे. या घटनेची वैद्यकीय अधिकारी यांनी कुठलीही दखल न घेता नर्सला पाठीशी घालण्याचा पर्यत केला आहे. या बाबत बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ पातळी पर्यत कागदपत्रे तयार करून तक्रार केली होती.तरी कुठल्याही स्वरूपाची दखल घेतली जात नाही. तसेच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात डीलव्हेरीसाठी येणाऱ्या महिलेनं कडून पैसेची मागणी केली जात असते.तरीही वैद्यकीय अधिकारी हे अढळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी भूमिका कायम घेत असून हरिभाऊ पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील बाळाचा मुत्युला जबाबदार असणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी साठी १३ जून २०२२ रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.