कासार पिंपळगावात टग्यांचा सुळसुळाट फॉरेस्टमध्ये अल्पवयीन आदिवासी विद्यार्थ्यीनींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला,आरोपीची मुलींच्या आत्याला मोबाईलवर जातीवाचक शिविगाळ केल्याची क्लीप व्हायरल,पोस्को कलमा अंतर्गत गुन्हा दाखल
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) कासार पिंपळगाव, तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर येथील शेवगाव रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीतून घराकडे पायी जात असताना आदिवासी विद्यार्थ्यीनींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला असुन कासार पिंपळगावात टग्यांचा सुळसुळाट झाला आहे.संशयित आरोपीने मुलीच्या आत्याला मोबाईलवर फोन करून अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिविगाळ केल्याची क्लीप व्हायरल झाल्यामुळे आणि ती क्लीप पोलिस निरीक्षक यांनी प्रत्यक्षात ऐकून घेऊन मगच पोस्कोसह विविध कलमा अंतर्गत पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबतची घटना अशी की कासार पिंपळ गावातील १६ वर्ष १० महीने २० दिवस वयाची अल्पवयीन आदिवासी (भिल्ल)समाजातील एक विद्यार्थीनी ही कासार पिंपळगाव,तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे आपले आई,वडील, बहीण,भाऊ,यांचे समवेत एकत्र राहते. तीचे पालक शेती करून कुटुंबाची उपजीविका करतात.सदर पिडीता ही गावातील दादा पाटील राजळे महाविद्यालयात ११वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शनिवार दिनांक ९ ऑगष्ट २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पिडीत महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि तीच्या दोन आदिवासी मैत्रीणी अशा तिघी जणी गावातील काॅलेज सुटल्यावर शेवगाव रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या (फाॅरेस्ट)हद्दीतून घराकडे पायी जात असताना कासार पिंपळगावातील निलेश खोजे आणि त्यांच्या सोबत असलेले दोन अनोळखी इसम हे आमच्या पाठीमागून मोटार सायकल वर आले व आम्हाला त्याची मोटार सायकल आडवी लावून निलेश खोजे याने तिघीपैकी एका फिर्यादी असलेल्या पिडीतेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.पिडीतेने त्याच्या तावडीतून तीचा पकडलेला हात जोराचा झटका देऊन सोडून घेउन पळतच थेट आपले घर गाठले. त्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक १० ऑगष्ट २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता निलेश खोजे याने त्याचा मोबाईल नंबर ९३२२८४२४४० या नंबर वरून पिडीतेच्या मोबाईल वर काॅल करून म्हणाला की कालची घटना तू जर घरी सांगितली तर मी एकाही भिलट्याला कासार पिंपळगाव येथे राहू देणार नाही.मी मराठ्यांची औलाद आहे.असे म्हणून अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिविगाळ व दमदाटी करून त्याने मोबाईल बंद केला.पिडीतेच्या आत्याला मोबाईलवर जातीवाचक शिविगाळ केल्याची क्लीप व्हायरल झाल्यामुळे आरोपी विरोधात भक्कम पुरावा तयार झाला होता.म्हणून पिडीतेने निलेश खोजे आणि आनखी दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यापैकी एक इसम डोक्यावरील केस कापून टक्कल केलेल्या अवस्थेत होता असे वर्णन पिडीतेने सांगितले आहे. याबाबत पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ८५८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ७४,१२६(२),३५१(२),३५२, तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ८,१२, तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायदा १९८९ अंतर्गत कलम 3(1)(a),3(1)(r),3(1)(s),3(1)(w)(i),3(2)(va) या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब हे करीत आहेत. कासारपिंपळगाव हे टग्यांचे माहेरघर म्हणून उदयास येत आहे.शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी रस्त्याने जात असताना गावातील पाटाच्या पुलावर,मराठी शाळेच्या गेटवरील मंदीरातील सभामंडपात , बसस्थानकावर, सामाजिक वनीकरणाच्या कडेने,गाव तळ्यावर, काॅलेजच्या प्रवेश दारावर हे गावातील टग्गे शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून छेड काढण्यासाठी टपून बसलेले असतात.त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पाथर्डी पोलीसांच्या मदतीने गावातील महाविद्यालय परीसरात तक्रार पेटी बसवून त्याची चावी ही पाथर्डी पोलिसांकडे द्यावी म्हणजे मुलींच्या तक्रारी थेट पोलिसांकडे जातील अशी ग्रामस्थांची मागणी आहे.कासार पिंपळगावातील प्राथमिक शाळेच्या गेटवरील मंदीरातील सभामंडपात दिवस मावळतीला गेल्यावर गावातील अनेक टग्गे हे गोवा,मावा, गुटखा खाऊन मंदिर परिसरात घाण करीत आहेत.तसेच रात्री नवू वाजल्यापासून उशिरापर्यंत सभामंडपात मटका गांजा,दारू,पिऊन एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत मस्ती आणि धिंगाणा घालीत गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. मंदीरातील सेवकाने अनेक वेळा सांगितले तरी हे गावगुंड ऐकत नाहीत उलट मंदिराच्या सेवेकऱ्याला तुझ्या बापाचे मंदिर आहे का अशी उर्मट भाषा वापरून दमदाटी करीत आहेत.या मंदिरात पाथर्डी पोलिसांनी रात्री अचानक छापा घालून गावातील टग्यांना जेरबंद करावे अशी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालक वर्गाची मागणी आहे. या टगेगिरी मुळे गावातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी,माता, भगिनी,सरकारी महीला कर्मचारी यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पाथर्डी पोलिसांनी याची त्वरित दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे. गुन्ह्याची तातडीने दखल घेऊन पाथर्डी पोलिसांनी संशयित आरोपीच्या घरी जाऊन छापा टाकला असता आरोपी आपला मोबाईल बंद करून घरातून फरार झाला आहे.पाथर्डी पोलिस कसून तपास करीत आहेत.आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी दिले आहे.