श्री.गो.से.हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

श्री.गो.से.हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कूल मध्ये मार्च 2024 मध्ये माध्यमिक शालांत परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शालेय समिती चेअरमन खलील देशमुख होते. व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ उपमुख्याध्यापक एन.आर.पाटील , पर्यवेक्षक आर.एल. पाटील ,ए.बी.अहिरे सौ.ए.आर.गोहिल मॅडम, ज्येष्ठ शिक्षक महेश कौंडिण्य उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.याप्रसंगी संगीत शिक्षक सागर थोरात व रुपेश पाटील यांनी ईशस्तवन सादर केले.
मुख्याध्यापिका सौ.पी. एम.वाघ यांनी विद्यालयाचे शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांना नुकताच अमळनेर येथील साहित्य संमेलनात जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने सत्कार केला.तसेच विद्यार्थ्यांना जीवनात प्रगती करण्यासाठी विविध सूत्रे सांगितली व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करून तसेच गीते सादर करून शाळेविषयी ऋण व्यक्त केले.
शाळेतील शिक्षकआर.बी.बोरसे व बी. एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना जीवनात प्रगतीसाठी व परीक्षा संबंधी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात खलील देशमुख यांनी विद्यार्थ्यांमध्ये सत्याचा शोध घेण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले व शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उज्वल पाटील यांनी तर आभार एम.एन.देसले सरांनी व्यक्त केले.
या समारंभास विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.