मुबंई येथील वरिष्ठ पत्रकार गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल चे मुख्य संपादक अनिल महाजन यांनी महाराष्ट्र पोलिसांची सत्य व्यथा व कथा कशी मांडली. पूर्ण आर्टिकल नक्की वाचा सविस्तर.

महाराष्ट्र सरकारमध्ये खाकीचा कोणी वाली आहे का

पोलिसांचा मुलगा पोलिस खात्यात पोलीस होण्यास का नकार देतो.

मुबंई येथील वरिष्ठ पत्रकार गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल चे मुख्य संपादक अनिल महाजन यांनी महाराष्ट्र पोलिसांची सत्य व्यथा व कथा कशी मांडली. पूर्ण आर्टिकल नक्की वाचा सविस्तर.

काय कसूर आहे त्या गार्ड ड्युटी करणाऱ्या पोलिसांचा.

कोविड मध्ये राज्यातील तणावाखाली असलेल्या अनेक पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपला जिव गमावला आहे. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. मायबाप सरकार पोलिसांनी जगायचं तरी कसं ते तरी सांगा.

महाराष्ट्र पोलीस ,मुंबई पोलीस म्हटले की देशातच नव्हे तर जगात नावलौकिक आहे. पोलिसांची खाकी बाहेरून कडक तर आतून प्रेमळ व निर्मळ आहे. पोलीस बघितले की भीतीही वाटते आणि आदर पण वाटतो. महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलाची सद्याची दशा आणि दिशा काय आहे. यावर आज थोडक्यात विचार मांडतो आहे. जगात नावलौकिक असलेले महाराष्ट्र पोलीस , मुंबई पोलीस यांची काळजी घेणारे महाराष्ट्र सरकार मध्ये कोणी वाली आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गार्ड ड्युटी करणाऱ्या पोलिसांची दिनचर्या बघितली तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. काय कसूर आहे हो त्या गार्ड ड्यूटी करणाऱ्या पोलिसांचा . *पोलिसांना सुद्धा परिवार आहे.पोलिसांना सुद्धा भावना आहेत,त्यांच्या स्वतःच्या काही इच्छा-आकांक्षा आहेत.त्यांनाही नातं-गोत आहे. त्यांनाही सर्वांच्या मरण-धरण,लग्न याव मध्ये जावे लागते* महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्यसरकारने कुठलेही जास्तीचे अतिरिक्त आर्थिक बजेट किंवा कुठलेही विशेष पॅकेज दिलेले नाही आहे. येवढ्या कमी पगारात घर-प्रपंच चालत नाही. महिना अखेर आला की पोलिसांना रिक्षाभाडे अथवा गाडीत पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे राहत नाही. महाराष्ट्राच्या संस्कृती प्रमाणे राज्यात जेवढे सण-उत्सव येतात त्यात एकाही सण-उत्सवाला या पोलिसांना आपल्या घरी आपल्या *परिवारासोबत पंचपक्वान्नाचे जेवण खाता येत नाही.रस्त्यावर ठिकठिकाणी तंबू टाकून बंदोबस्ताला असणारे अनेक पोलिस कर्मचारी कोणी भुर्जीपाव खाऊन तर कोणी चिकू,केळी,वडापाव खाऊन दिवस घालवत आहेत.* त्यांना वाढीव ड्युटी ही करावी लागते. पोलिस विभागानी त्यांच्या आरोग्यासाठी कुठलीही हेल्दी खानावळ सुरु केलेली नाही.
पोलीस कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी राज्य शासनाच्या अशा कोणत्याही भरीव योजना गृहखात्याने लागू केलेल्या नाहीत. अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा ,गृह संकुलाचा विषय प्रलंबित आहे.काही पोलीस कर्मचारी विस्कळीत झालेल्या पडायला आलेल्या बिल्डिंगमध्ये आपला जीव मुठीत घेऊन नाईलाजास्तव आपले आयुष्य काढत आहेत. एवढी दैनंदिन वाईट परिस्थिती महाराष्ट्र मुंबई पोलीस बांधवांची आहे. त्यात यांना आपल्या हक्कासाठी आंदोलन ही करता येत नाही.
एखाद्या पोलीस कर्मचार्‍याच्या घरात चार ते पाच व्यक्ती असतील तर मोजक्या पगारावर त्यांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा मुलांचे शैक्षणिक खर्च, आरोग्य खर्च , घरात म्हातारे आईवडील असतील तर त्यांचा औषधी चा खर्च दैनंदिन गरजा पूर्ण होण्यासाठी लागणारा साहित्य,कसे आणायचे त्यात रोज वरून बायको विचारते आज भाजी काय करू त्यासाठी लागणारा खर्च यातच संपूर्ण दिवस त्यांचा टेन्शनमध्ये जातो कुठलीही आकांक्षा पूर्ण होत नाही आणि शरीराला विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ लागतात जसे हाय बीपी,शुगर,डायबिटीज, दमा, या गोष्टींना पोलिसांना सामोरे जावे लागते शेवटी आत्महत्या करण्याची वेळ त्या पोलीस कुटुंब वर येत आहे. राज्य सरकारच्या ढिसाळ योजना आणि धोरण कुंपणच शेत खात आहे.

एका मान्यताप्राप्त कॉलेजच्या किंवा विद्यापीठच्या प्राध्यापकाला दीड ते दोन लाख रुपये पगार आहे तो प्राध्यापक दिवसभर बंद केबिनमध्ये पंखा व एसीच्या खाली बसून दिवसातून फक्त दोन तास लेक्चर देतो. यासाठी राज्यसरकार प्रत्येक प्राध्यापकाला दीड ते दोन लाख रुपये इतका पगार देते. मला सांगा असे सरकार चे धोरण असले तर आपले राज्य ,देश कसे प्रगती करेल. एकीकडे आपले पोलीस जीवाची बाजी लाऊन काम करत आहेत त्यांना फक्त महिन्याला पंचवीस ते तीस हजार पगारात काम करावे लागते. ज्यांच्या जीवावर तुम्ही-आम्ही हे राज्य सुरक्षित आहे असे जीवाची बाजी लावणारे महाराष्ट्र पोलीस आज कुठल्या परिस्थितीतून आयुष्य जगत आहेत. यावर सत्ताधारी ,विरोधकांना व सर्व पक्षीय राजकीय सामाजिक व्यक्तींनी विचार करण्याची गरज आहे.

राज्यातील १००% यांपैकी ९५ टक्के पोलीस कुटुंबातील पोलीसाचा मुलगा पोलीस खात्यात येण्यास तयार नाही त्याचे कारण आहे. आपल्या बापाचे तोडके-मोडके आयुष्य बघून कोणत्याही पोलिसाचा मुलगा पुन्हा आपण पोलीस व्हावे म्हणून तयार होणार नाही. आजही ग्रामीण भागातील पोलिस लाईन बघितल्यावर दहा बाय दहाच्या जागेमध्ये पोलिस कॉटर्स आहेत.तशा परिस्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रचंड तणावाखाली महाराष्ट्र पोलीस आपले आयुष्य जगत आहेत१० ते १५ टक्के पोलीस कर्मचारी सोडले तर पोलीस वर्ग आपल्या दैनंदिन गरजा भागवू शकत नाही आयुष्याला कंटाळलेल्या आहेत. एवढ्या तणावाखाली असून सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दट्ट्या त्यांच्या मागे आहेच. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्व शहर व गाव सीसीटीव्ही मय झाले आहे. पोलिस बांधवाला साधी तंबाखू पुडी खाण्यासाठी सुद्धा कानाकोपऱ्यात जावे लागते एवढा मोठा धाक निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांच्या,राजकीय,आमदार,खासदार,मंत्री सेलिब्रिटीच्या यांच्या घराची व कुटुंबाची रखवाली करण्यासाठी माझा पोलीस बांधव रात्रंदिवस २४ तास त्यांच्या घराबाहेर वॉचमेन सारखी ड्युटी पार पाडत आहे. त्या पोलिसांच्या जीवाची व त्याच्या परिवाराची रखवाली कोण करणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या मुलांना ही वाटते आपण मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे. बाईक व कार मधून फिरावे पण ते आजच्या युगात शक्य नाही . आजही ग्रामीण भागात राहणाऱ्या व मेट्रो सिटी शहरी भागात ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंब त्यांच्या गावी दूध गाडीने प्रवास करतात.याचे अनेक जिवंत उदाहरण मी आपल्याला सांगू शकेल नवीन फळीतल्या पोलीस भरती झालेल्या तरुणांना पोलीस आहे म्हणून युवा पिढीतील युवती लग्नासाठी सुद्धा स्थळ नाकारत आहेत. मुलींना सुद्धा पोलिस नवरा नको आहे कारण त्यांच्या कडे फेमिली ला द्यायला टाईमच नसतो मायबाप सरकार पोलिसांनी जगायचे कसे ते तरी सांगा.मी पोलीस नाही तरी पोलिसाच्या व्यथा मला माहित आहेत. माझ्या जवळचे अनेक मित्र मंडळी ,नातेवाईक पोलीस दलामध्ये आहेत.त्यामुळे त्यांची व या महाराष्ट्र पोलीस खात्याची दशा व दिशा बघून राहवले जात नाही म्हणून राज्य सरकार समोर आपले विनंतीपूर्वक विचार मांडावेसे वाटले.

खात्यात सेवा बजावत असताना एखादा पोलीस कर्मचारी मयत झाल्यास त्याच्या कुटुंबात पाच ते सहा लोक जर असतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून त्या पोलिसाची असेल तर त्या कुटुंबासाठी राज्यातील पोलिसाचे गृहखाते त्यांना कुठलाही आधार देत नाहीत तोडकी मोडकी मदत देऊन त्यांचे पोलिस कॉटर्स खाली करण्यास त्यांना सांगितले जाते. अशावेळी त्या पोलीस कुटूंबावर काय वेळ येत असेल यासाठी सरकारने आशा होणाऱ्या या घटनांसाठी काही तरी एक धोरण निश्चित करून पोलिस कर्मचाऱ्यांची कुटुंब सुरक्षित करावे.

‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’

आपला स्नेहांकित

अनिल महाजन.
चेअरमन :- गर्जा महाराष्ट्र न्यूज समूह.
प्रदेशअध्यक्ष:- महाराष्ट्र माळी समाज महासंघ
संस्थापक अध्यक्ष :- ए.एम फाउंडेशन
मोबाईल नंबर:- 9594754725/9967717171
ईमेल आयडी:- anil.maza@gmail.com
वेब साईट:- www.anilmahajan.com