घोडेगावातील प्रवाशांना लुटणाऱ्या शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावच्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक,पाच लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त

घोडेगावातील प्रवाशांना लुटणाऱ्या शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावच्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक,पाच लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) घोडेगाव बसस्थानकावर प्रवासी वाहतूकीचे नाटक करत प्रवाशांना लुटणाऱ्या शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावच्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, या कारवाईत पाच लाख पस्तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील घोडेगाव बसस्थानकावर १६ जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अरुण जगन्नाथ गंगावणे (वय ४८) राहणार महालक्ष्मी हिवरे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर हे आपल्या घरी जाण्यासाठी नेवासा तालुक्यातील घोडेगाव बसस्थानकावर वाहनांची वाट पहात थांबलेले असताना यातील काही अज्ञात आरोपींनी त्यांना प्रवासी म्हणून कारमध्ये बसवले आणि चाकुचा धाक दाखवून त्यांच्या कडील मोबाईल आणि रोख स्वरूपातील रक्कम बळजबरीने काढून घेऊन पसार झाले होते.या बाबत सोनई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९,(६) प्रमाणे अरुण जगन्नाथ गंगावणे यांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक पोलीसांचे एक तपास पथक तयार केले होते.त्या पथकामध्ये पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, गणेश लोंढे, संदिप पवार ,शाहीद शेख, गणेश धोत्रे,फुरकान शेख, संदिप दरंदले, प्रमोद जाधव,अशोक लिपणे, मयुर गायकवाड, प्रशांत राठोड यांचे एक पथक तयार करून त्यांना आवश्यक त्या सुचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रवाना केले होते.१८ जुलै रोजी तपास पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करीत असताना सोनई पोलिस स्टेशनला वर नमुद केलेला गुन्हा हा विश्वास रमेश पंडीत, राहणार भावी निमगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर यांनी त्यांच्या साथीदारां समवेत सर्वांनी मिळून केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.त्यांनी गुन्हा करताना वाहन क्रमांक एम एच १२ एन एक्स २४०६ हे वापरले असुन ते वाहन वांबोरी येथुन अहिल्यानगर कडे येणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती खबऱ्या कडून मिळाली होती.मग तपास पथकाने मिळालेल्या माहितीनुसार पंचासमक्ष वांबोरी फाट्याजवळ संशयित नंबरच्या कार चा शोध घेतला असता त्यांना ती कार तेथे मिळून आली.मग ती कार थांबवून त्या कारची तपासणी केली असता त्या कारमध्ये १) विश्वास रमेश पंडीत (वय २८),२) रोहन बाळासाहेब मोरे (वय२१),३) संदेश अनिल पेटारे (वय२१),४) सोपान पांडुरंग वाबळे (वय२७) सर्व राहणार भावी निमगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर हे सर्व जण आढळून आले.या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या कडील ह्युंदाई कार क्रमांक एम एच १२ एन एक्स २४०६ या कारमधून त्यांचा आणखी एक साथीदार ५) दिपक आहेर, राहणार मजलेशहर, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर (फरार) यांच्या सह नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथुन एका इसमाला चांदा येथे सोडण्यासाठी प्रवासी म्हणून गाडीत बसवले.नंतर त्यास चाकूचा धाक दाखवून त्यांच्या कडील मोबाईल आणि रोख स्वरूपात रक्कम काढून घेतल्याची माहिती सांगितली. मग पंचासमक्ष ताब्यातील संशयित आरोपी कडून ५ लाख ३५ हजार रुपये किंमतीची हुंदाई कंपनीची एसेंट कार,व चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नेवासा तालुक्यातील सोनई पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सोनई पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करीत आहेत.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,व शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील साहेब यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत त्यांच्याही मुसक्या आवळण्या साठी पोलीसांनी कंबर कसली पाहिजे असे सर्व सामान्य लोकांना वाटू लागले आहे.