Home पाचोरा अमळनेर येथे पार पडलेल्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात पाचोराच्या कु.चेतना हिरे यांचा...

अमळनेर येथे पार पडलेल्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात पाचोराच्या कु.चेतना हिरे यांचा सहभाग

अमळनेर येथे पार पडलेल्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात पाचोराच्या कु.चेतना हिरे यांचा सहभाग

 

 

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने आयोजित चौथे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलन दि.10/3/2026 रोजी अमळनेर येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत साहित्यिक सादरीकरण केले.

या संमेलनात श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने “भीतीच्या सावटातील महिला दिवस” या विषयावर कविता सादर केली. तिच्या कवितेतून महिलांच्या सुरक्षिततेविषयीची भावना आणि समाजातील वास्तव परिस्थिती मांडण्यात आली.

या संमेलनात कविता, बोली भाषेतील साहित्य ,कथाकथन, परिसंवाद आदी विविध साहित्यप्रकारांद्वारे विद्यार्थ्यांनी आपली साहित्यिक प्रतिभा सादर केली. संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्य क्षेत्रात आपले विचार मांडण्याची संधी मिळाली.या संमेलनाच्या समारोपाला चेतना हिरे हिने आपले मनोगत व्यक्त केले.

चेतना हिरे हिला या सहभागासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ वासुदेव वले सर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. श्रावण तडवी सर, प्रा. अमित गायकवाड सर तसेच प्रा.जयश्रीताई वाघ मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व साहित्यप्रेमी उपस्थित होते

Don`t copy text!