आज वेब & डिजीटल मिडीया ची पाचोरा शहर आणि तालुका संपादक यांची बैठक उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न

आज वेब & डिजीटल मिडीया ची पाचोरा शहर आणि तालुका संपादक यांची बैठक उत्साहपुर्ण वातावरणात बहुळा धरणाजवळ संपन्न झाली

सर्वांनी एकजुटीने काम करायचे आणि आगामी काळात संघटनेचे ध्येय धोरण आणि विविध कार्यक्रम ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली

पाचोरा : अनेक दिवसांपासुन संघटनेची बैठक झालेली नव्हती पण सर्वांची इच्छा असल्याने अजयकुमार जैस्वाल यांनी बैठकीचे आयोजन आज कृष्णा सागर ( बहुळा धरणाजवळ ) करण्यात आले होते.पाचोरा शहर तालुका वेब & डिजीटल मिडीया चे सर्व संपादक यांनी एकत्रित येत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तब्बल तीन तास बैठक चालली आणि सविस्तर चर्चा झाली.

सर्वांनी एकजुटीने कार्य करून आगामी काळात विविध उपक्रम राबवण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या सर्वांचे मते आणि भावना समजुन घेतल्या.

यावेळी संघटनेत कोणकोणते उपक्रम आगामी काळात राबवणार आहे याची माहिती अजयकुमार जैस्वाल यांनी दिली तर सर्व समंतीने ठेवलेले सर्व विषय सर्वानुमते पारीत झाले.

यावेळी योगेश पाटील सर व ईश्वरभाऊ चोरडीया, दिलीप जैन यांनी मार्गदर्शन केले. तर बैठकीत सर्व दिशा आणि कामकाज ठरवण्यात आले.

लवकरच पुढील बैठकीत उर्वरीत विषय घेण्यात येतील.

बैठकीला -योगेश पाटील- संपादक झेप इंडिया यांनी सहकार्याची भावना बोलुन दाखवली.

यावेळी ईश्वरभाऊ चोरडिया- संपादक जेबीएन महाराष्ट्र
दिलीप जैन – संपादक सत्यजीत न्युज ,
रविशंकर पांडे – संपादक आरव्हिआर न्युज,
दिनेश चौधरी – संपादक दिशा न्युज,
नरसिंह भुरे – संपादक आरोग्यदुत न्युज,
दिलीप पाटील- संपादक ट्रेन लाइव न्युज-
निलेश पाटील- संपादक – ग्राम महाराष्ट्र न्युज
प्रमोद बारी- संपादक जनलक्ष्य न्युज-
चंचल सोनार- संपादक साक्ष न्युज-
दिपक मुलमुले – संपादक दिपलक्ष न्युज
दिपक गढरी – सी एन आय महाराष्ट्र
छोटुभाऊ सोनवणे – संपादक
सचिन चौधरी – संपादक लोकनायक न्युज
गौरी सोनार- साक्ष न्युज
चंदु खरे- संपादक
इश्वर खरे,अतुल माळी,गजानन श्रीसागर,स्वप्नील कुमावत –

तर आजच्या बैठकीत काही वैयक्तिक कारणास्तव उपस्थित न राहिल्याने त्यांनी फोन करून सर्व विषयांना खालील संपादक यांनी पाठींबा दर्शविला.
प्रविणभाऊ ब्राम्हणे- संपादक पिबीसी मातृभुमी,राजुभाऊ धनराले – संपादक आर के न्युज,
प्रमोद पाटील सर -केसरीराज लाइव, अमोल प्रभाकर झेरवाल – संपादक रत्नाप्रभा न्युज, दिलीप परदेशी- संपादक झुम मराठी न्युज-संदिप मराठे – जनलक्ष्य कार्यकारी संपादक,चिंतामन पाटील,फकिरचंद पाटील इंडिया आप तक,बंडु सोनार- संपादक तालुका माझा यांचा पाठींबा होता. बैठक यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी अनमोल सहकार्य दिले. प्रास्ताविक अजयकुमार जैस्वाल यांनी तर आभार संजय पाटील यांनी केले.