कोळगाव येथे भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर प्रा. डी. पी.भोसले यांचं व्याख्यान….!!!!!

कोळगाव येथे भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर प्रा. डी. पी.भोसले यांचं व्याख्यान….!!!!!

 

 

कोळगाव ता भडगाव _ दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित वरिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय कोळगाव यांच्यावतीने साजरी करण्यात आली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्राध्यापक डी.पी.भोसले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे प्राथमिक व उच्च शिक्षणविषया संदर्भात डी.पी. भोसले यांनी आपल्या व्याख्यानात शिक्षणाविषयी मत व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज यांनी शिष्यवृत्ती मंजूर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक मूल्याला हातभार लावला त्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एलजी कांबळे होते या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्राध्यापक संदीप बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.