द अकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवला एंड्युरन्स चॅम्पियनशिपमध्ये विजय
– सहा विद्यार्थ्यांनी मिळवले १ रौप्य आणि ९ कांस्यपदक
– आफ्रो-आशियन आंतरराष्ट्रीय एंड्युरन्स चॅम्पियनशिपसाठी निवड
१७ मार्च २०२५
पुण्यातील द अकॅडमी स्कूल (TAS) च्या विद्यार्थ्यांनी एंड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिप २०२४-२५ मध्ये शानदार कामगिरी करत एकूण १० पदके जिंकली. या स्पर्धेत सात विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, त्यापैकी सहा विद्यार्थ्यांनी मिळून १ रौप्य आणि ९ कांस्यपदक जिंकले.
या विद्यार्थ्यांची फिलिपिन्समध्ये होणाऱ्या आफ्रो-आशियन आंतरराष्ट्रीय एंड्युरन्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. एंड्युरन्स हा स्केटिंगसारख्या उपकरणांचा वापर करून खेळला जाणारा एक खेळ आहे, जो २० हून अधिक देशांमध्ये खेळला जातो.
पदक विजेत्यांमध्ये, आर्या शिंदे हिने १ रौप्य आणि २ कांस्य पदके, आहना कुलकर्णी हिने २ कांस्य पदके, नप्पिनाई आर यांनी २ कांस्य पदके, श्रीनिवास अरवली यांनी १ कांस्य पदक, दीव्या सरकार हिने १ कांस्य पदक, आणि कीर्तिश्री आर हिने १ कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवला होता.
TAS च्या सीईओ डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या की, TAS मधील प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेपूर्वी आणि नंतर तासभर विशेष प्रशिक्षण दिले. ही एक उल्लेखनीय कामगिरी असून आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आम्ही TAS मध्ये सर्व प्रकारच्या खेळांना आणि मनोरंजनाला चालना देतो. TAS मधील प्रशिक्षकांकडे जागतिक दर्जाचे कौशल्य असून भारतातील प्रसिद्ध नसलेल्या खेळांचाही दर्जा उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.